आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला:'अनपॉज्ड: नया सफर' ट्रेलर रिलीज, नागराज मंजुळे दिग्दर्शित 'वैकुंठ' लघुपटाचा या अँथॉलॉजीमध्ये समावेश

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच शॉर्ट फिल्म्सचा समावेश

'अनपॉज्ड: नया सफर‘ या हिंदी कथांचा संग्रह असलेल्या अँथॉलॉजीचा लक्षवेधी ट्रेलर लाँच करण्यात आला. याचा प्रीमियर येत्या 21 जानेवारी 2022 रोजी 240 हून अधिक देश-प्रदेशात होणार आहे. अनपॉज्डच्या पहिल्या सीझनला भरभरून प्रतिसाद मिळाला असून 2020 मध्ये त्याचा प्रीमियर झाला होता. महासाथीने प्रत्येकाच्या जीवनात आव्हाने निर्माण केली, प्रत्येकाची प्रतिसाद देण्याची स्वत: निराळी पद्धत असते. अमेझॉन ओरिजनलच्या दुसऱ्या सीझनमध्ये अभिनव स्वरुपाच्या पाच हिंदी शॉर्ट फिल्म्सचा समावेश असेल. नवीन वर्षाचे स्वागत करताना सकारात्मक बाजूंवर भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कसदार अभिनयाकरिता प्रसिद्ध असलेले साकीब सलीम, श्रेया धन्वंतरी, नीना कुलकर्णी आणि प्रियांशू पेनयुली व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळतील. अंधाऱ्या बोगद्याच्या शेवटी प्रकाशाचा साक्षात्कार होतो, हे हृदयस्पर्शी संस्मरण अनपॉज्ड: नया सफर मधून दिल्याचे दिसते. मालिकेचा ट्रेलर सुंदर आहे. प्रेम आणि सकारात्मकतेत गुंफलेल्या कथा, नव्या वर्षाची नवी सुरुवात करण्याची उमेद आपल्याला देऊन जातात.

कथामालिकेतील शॉर्ट फिल्म्समध्ये समावेश आहे-

  • वैकुंठ, नागराज मंजुळे दिग्दर्शित; अर्जुन करचे आणि हनुमंत भंडारी यांच्या भूमिका.
  • तीन तिघाडा, दिग्दर्शन- रुचिर अरुण; साकीब सलीम, आशीष वर्मा आणि सॅम मोहन यांच्या भूमिका. .
  • द कपल, दिग्दर्शन- नुपूर अस्थाना; श्रेया धन्वंतरी आणि प्रियांशू पेनयुली यांच्या भूमिका.
  • गोंद के लड्डू, शिखा माकन दिग्दर्शित; दर्शना राजेंद्र आणि लक्षवीर सिंग सरन यांच्या भूमिका.
  • वॉर रूम, अयप्पा केएम दिग्दर्शित; गीतांजली कुलकर्णी, रसिका आगाशे, पुरनंदन वांधेकर आणि शर्वरी देशपांडे यांच्या भूमिका.

वैकुंठचे दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले की, “अनपॉज्ड: नया सफर कथा संग्रह मालिकेच्या प्रत्येक कलाकृतीत अनेक भावनिक छटा उलगडल्या आहेत. वैकुंठ दु:ख आणि आशेचे संतुलन राखते. त्यात अनिश्चितता खच्चून भरली आहे. एक टीम म्हणून मला अभिमान वाटतो आणि या कलाकृतीचा भाग होता आले, हे माझे भाग्य मानतो. प्रेक्षकांच्या मनात ही मालिका दीर्घकाळ घर करेल, ही आशा बाळगतो.”

तीन तिघाडाचे दिग्दर्शक रुचिर अरुण म्हणाले की,“अनपॉज्ड: नया सफर मधील कथा प्रवाही आहेत, त्यात भावनांची सरमिसळ असून या संग्रहांची फिल्म प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तीन तिघाडा सोबत आमचा भर मानवी भावना अधोरेखित करण्यावर असून आपल्यापैकी प्रत्येकाला महासाथीचा तडाखा वादळाप्रमाणे बसलेला आहे. या सिनेमाचे निवेदन अभिनव असून स्क्रीनवर कलाकारांचा आविष्कार अफलातून झाला आहे. प्रेक्षक वर्गाला आमचा हा प्रयत्न आवडेल ही आशा.”

बातम्या आणखी आहेत...