आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहित आहे का?:150 रु. पगारावर दिग्दर्शक एचएस रवैल यांचे सहायक बनले होते राजेंद्र कुमार, ओळख निर्माण करायला लागली होती 7 वर्षे 

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • ‘गीत’, ‘आरजू’, ‘झुक गया आसमान’ सारखे हिट चित्रपट देणारे हिंदी सिनेमाचे सुपरस्टार राजेंद्र कुमार यांना जुबली कुमारदेखील म्हटले जाते. त्यांच्या अनेक चित्रपटाने सिल्व्हर जुबली साजरी केली.
 • त्यांच्या सुपरहिट गाण्यांपैकी एक गाणे त्यांच्या चाहत्यांच्या आवडीचे आणि राजेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वावर फिट बसणारे... 'अजी हमसे बचकर कहां जाइएगा, जहां जाइएगा हमें पाइएगा...'

राजेंद्र कुमार यांचा जन्म पंजाबच्या सियालकोटमध्ये एका पंजाबी कुटुुंबात झाला होता. त्यांचे वडील लाहोरमध्ये कपड्याचा व्यवसाय करत होते. फाळणीनंतर राजेंद्र मुंबईला आले. हीरो बनण्याचे स्वप्न पाहत राजेंद्रने ‘जोगन’मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली. मात्र, चित्रपट चालला नाही. पण, निर्माते देवेंद्र गोयलला त्यांचा अभिनय आवडला आणि आपल्या पुढच्या चित्रपटात त्यांना मुख्य भूमिका देण्याचे वचन दिले. 

150 रुपये पगारावर बनले सहायक

दीड वर्षानंतर त्यांनी ‘वचन’मध्ये राजेंद्र कुमार यांना मुख्य भूमिकेत घेतले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि बॉलिवूडला एक स्टार मिळाला. गीतकार राजेंद्र कृष्णाच्या मदतीने 150 रुपये पगारावर दिग्दर्शक एचएस रवैल यांचा सहायक म्हणून राजेंद्र कुमार काम करू लागले. राजेंद्र यांना चित्रपटात काम मिळाले मात्र मनासारखी प्रसिद्धी अजून मिळाली नव्हती. सिने इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना 7 वर्षे लागली. ‘मदर इंडिया’ मध्ये इतर कलाकारांप्रमाणेच राजेंद्र कुमार यांचेही कौतुक झाले. त्यानंतर 1963  मध्ये ‘मेरे महबूब’ सुपरहिट ठरला आणि राजेंद्र कुमार प्रसिद्ध झाले.

 • मैत्रीला जागले : साधनाचा हीरो होण्यासाठी राजेंद्रने अर्ध्या मानधनात केले काम

रामनंद सागर ‘आरजू’ चित्रपट बनवणार होते. त्यासाठी त्यांनी राजेंद्र कुमार यांना हीरोच्या भूमिकेत घेतले. चित्रपटात साधनाच हिरोइन असावी, अशी त्यांची इच्छा होती. कारण त्या काळी साधना ज्या चित्रपटात काम करायच्या तो चित्रपट यशाची खात्री मानला जायचा. मात्र, त्या राजेेंद्र कुमारपेक्षा जास्त मानधन मागत होत्या. राजेंद्र कुमारला जेव्हा ही गाेष्ट कळाली तेव्हा स्वत: राजेंद्र कुमार साधनाला भेटले. मात्र, साधना ऐकायला तयार नव्हत्या. तेव्हा राजेंद्र कुमारने रामानंद सागरला सांगितले, मी अर्धे मानधन घेईल मात्र तुम्ही साधनाची मागणी पूर्ण करा. चित्रपट बनला आणि सुपरहिट ठरला. त्यानंतर रामानंद सागरने दिल्ली टेरिटरीचे उत्पन्न राजेंद्र कुमारला देऊन टाकले. अशा प्रकारे राजेंद्रला त्यांच्या मानधनपेक्षा कितीतरी पटीने अधिक पैसे मिळाले. निभावले वचन

 • निभावले वचन.... ज्या मुलीला लग्नाचे वचन दिले तिच्यासोबतच केले लग्न

राजेंद्र कुमार इंडस्ट्रीत स्थायिक होण्याचा प्रयत्न करत होते. त्याच काळात त्यांचा एक नातेवाईक त्यांच्याकडे आला आणि त्यांना आपल्या मित्राकडे घेऊन गेला. त्या मित्राची एक मुलगी होती, तो मित्र म्हणाला माझी मुलगी आहे. मी तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. यावर राजेंदने त्यांना सांगितले, मी मुंबईत संघर्ष करत आहे. तुमची मुलगी गरीब परिस्थितीत माझ्यासोबत राहायला तयार आहे का? त्यानंतर ते मुलीला भेटले आणि लग्नासाठी तयार झाले. ते जेव्हा दिल्लीत आले. तेव्हा त्यांच्या नातेवाइकांनी इकडेदेखील एक मुलगी पाहून ठेवली होती. राजेंद्रने त्यांना सांगितले, मी एकीला वचन दिले आहे. त्यामुळे मला हे नाते मान्य नाही.

 • लग्नानंतर झाले प्रेम : राजेंद्र कुमार आणि सायरा बानोचे अफेअरही चर्चेत राहिले

राजेंद्र कुमार विवाहित आणि तीन मुलांचे वडील होते. त्याकाळी सायरो बानोसोबत त्यांचे ‘आयी मिलन की बेला’, ‘झुक गया आसमान’ आणि ‘अमन’सारखे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. दोघांची जोडी लोकांना खूप आवडली. दोघांचे अफेअरदेखील चर्चेत राहिले. त्या काळात राजेंद्र आणि सायरा लग्न करणार असल्याचेही बोलले जात होते. नंतर सायरा दिलीप कुमार यांच्याकडे आकर्षित झाल्या. राजेंद्रला जेव्हा हे कळाले, तेव्हा त्यांनी सायराशी ब्रेकअप केले. ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांनी ही गोष्ट मान्य केली होती, सायरा एक सुंदर आणि चांगली मुलगी होती. आम्ही ऐकमेकांना पसंत करत होतो, असे त्यांनी लिहिले आहे.

 • अपयशाच्या काळात... सावन कुमार 11 हजार रुपये घेऊन गेले आणि राजेंद्रला साइन केले

एक काळ असाही अाला जेव्हा राजेंद्र कुमार यांना चित्रपट मिळत नव्हते, त्या काळात ते आपल्या बंगल्यातून बाहेर निघत नव्हते. दिग्दर्शक सावन कुमार ‘साजन बिना सुहागन’ या चित्रपटात त्यांना घेऊ इच्छित होते. या चित्रपटात सावन कुमारने नूतनला नायिका म्हणून घेतले होते. राजेंद्र नुतनवर कधी काळी खूप प्रेम करत होते, या हेतूने सावन कुमार त्यांच्याकडे गेले होते. ते जेव्हा राजेंद्रच्या घरी पोहोचले तेव्हा तेथे आधीच राज कपूर साहेब बसलेले दिसले. त्यानंतर सावन कुमारने राजेंद्र कुमार यांना 11 हजार रुपयांचा धनादेश दिला आणि चित्रपटासाठी साइन केले. तेव्हा राज कपूर म्हणाले, मी चित्रपटाची पहिली क्लॅप देण्यासाठी येईल, त्यानंतर सावन म्हणाले, तुम्ही क्लॅप देण्यासाठी नव्हे तर रौप्यमहोत्सवी ट्रॉफी देण्यासाठी या. चित्रपट हिट ठरला आणि राज कपूरदेखील त्यांना ट्रॉफी देण्यासाठी आले.

 • बंगल्याने पालटले भाग्य

कॉर्टर रोडवरील एक बंगला राजेंद्र कुमार यांना खूप आवडला होता. त्यांनी तो विकत घेण्याचे ठरवले. हा भूत बंगला आहे, घेऊ नका, असे लोकांनी त्यांना सांगितले. राजेंद्रकडे बंगला विकत घेण्याचे पैसे नव्हते. त्याचवेळी बीआर चोप्र दूत बनून त्यांच्या जीवनात आले. चोप्रा यांनी राजेंद्र यांना एका चित्रपटासाठी अॅडव्हान्स पैसे दिले आणि सोबतच दोन आणखी चित्रपटांची आॅफर दिली. त्यानंतर राजेंद्र कुमार यांनी तो बंगला विकत घेतला. विशेष म्हणजे त्या बंगल्यात राहायला गेल्यानंतर राजेंद्र कुमार यांनी एका पाठोपाठ एक असे हिट चित्रपट दिले. मात्र, काही दिवसांनंतरच त्यांच्या करिअरमध्ये ब्रेक लागला आणि त्यांनी सपोर्टिंग रोल करणे सुरू केले. मात्र, पुढे त्यांना काम मिळणे बंद झाले. त्यामुळे त्यांना बंगला विकावा लागला. तो बंगला राजेश खन्नाने 60 हजार रुपयांत विकत घेतला. हाच बंगला ‘आशीर्वाद’ बंगल्याच्या नावाने ओळखला जाऊ लागला. आधी तो बंगला राजेंद्र कुमार यांची मुलगी ‘डिंपल’च्या नावावर होता.

 • प्रसिद्धीसाठी... ज्या बाजेवर झोपत ती बाज प्रसिद्ध झाली

राजेंद्र कुमार जेव्हा हिरो बनण्यासाठी मुंबईला आले. तेव्हा वांद्रे जवळील एका जुन्या इमारतीच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबत होते. त्याचे नाव बॉम्बे गेस्ट हाऊस होते. यात धर्मेंद्र पासून ते राजकुमार सारखे लोक येऊन थांबले होते. राजेंद्रदेखील येथेच थांबले आणि मोठे स्टार झाले. गेस्ट हाऊसच्या एजंटने त्या बाजेची खूप मार्केटिंग केली. तो हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांना सांगायचा, ही राजेंद्र कुमार यांची बाज आहे, ते येथेच झोपत आणि आज ते सुपरस्टार झाले आहेत. बाजेवर झोपणाऱ्याकडून तो एक्स्ट्रा पैसे घेत होता.

80 चित्रपट केले, त्यापैकी 35 चित्रपट ज्युबली हिट ठरले

 • राजेंद्र कुमार यांना सामाजिक कार्यासाठी लाल बहादूर शास्त्री हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 • कानून’ आणि ‘मेहंदी रंग लाग्यो’ (गुजराती सिनेमा) साठी राजेंद्र यांना जवाहरलाल नेहरूंकडून राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला.
 • 3 वर्षे 1964, 1965 आणि 1966 मध्ये त्यांना फिल्मफेअरमध्ये उत्कृष्ट अभिनेत्यासाठी नॉमिनेशन मिळाले.
 • 1969 मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...