आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • UP And Mumbai Police Reached Shilpa Shetty And Her Mother Sunanda's House To Interrogation, After Lucknow's Lady Fils A Case Of Fraud Of Crores

शिल्पाच्या अडचणीत वाढ:UP आणि मुंबई पोलिसांकडून शिल्पा शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांची चौकशी, कोट्यवधींच्या फसवणुकीचे आहे प्रकरण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये. एकीकडे शिल्पाचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणामुळे मागील 19 जुलैपासून तुरुंगात आहे, तर दुसरीकडे लखनौच्या एका महिलेने शिल्पा आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांच्या विरुद्ध कोट्यवधींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनंतर मुंबई आणि यूपी पोलीस बुधवारी अभिनेत्रीच्या जुहूस्थित घरी चौकशीसाठी पोहोचले होते.

समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये काही पोलीस अधिकारी शिल्पाच्या बंगल्याच्या आत दिसत आहेत. दरम्यान, काही पोलीस अधिकारी हातात नोटीस घेतलेले दिसत आहेत. फोटो पहा-

काय आहे संपूर्ण प्रकरण?

लखनौच्या विभूतीखंड पोलीस ठाण्यात ओमेक्स हाइट्सच्या रहिवासी ज्योत्स्ना चौहान आणि हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये रोहित वीर सिंह यांनी शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हजरतगंज पोलिसांनी दोघींनाही महिन्याभरापूर्वी चौकशीसाठी समन्स बजावले होते.

तक्रारकर्ती ज्योत्स्ना चौहानने सांगितल्यानुसार, तिने शिल्पाच्या कंपनीत 1.36 कोटींची गुंतवणूक करून लखनौ येथे वेलनेस सेंटर सुरू केले होते. यानंतर शिल्पाच्या जवळच्या लोकांनीच ते हडप केले. ज्योत्स्नाला गुंतवणूक करण्यापूर्वी शिल्पा शेट्‌टीचा व्हिडिओ दाखवण्यात आला होता. तिने पुढे सांगितल्यानुसार, जानेवारी 2019 मध्ये तिची भेट शिल्पा शेट्टीच्या जवळची व्यक्ती आणि अयोसिस कंपनीचा संचालक किरण बाबा याच्याशी झाली. किरणने ज्योत्स्नाला कंपनीचे अनेक प्रेझेंटेशन दाखवले. सोबतच फ्रेंचायझी घेतल्यास दरमहा 5 लाख रुपये कमाई होणार असे आश्वासन दिले होते.

उद्घाटनात शिल्पा येणार असल्याचे आश्वासन
किरणसोबत विनय भसीन, अनामिका चतुर्वेदी, ईशरफील धरमजवाला, आशा आणि पूनम झा सुद्धा होते. त्या सर्वांनीच सांगितले होते, की शिल्पाच्या कंपनीत 85 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यानंतर वेलनेस सेंटर उघडताना उद्घाटनाच्या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी सुद्धा येणार आहे. याच लोकांवर विश्वास टाकून ज्योत्स्नाने एप्रिल 2019 मध्ये लखनौच्या विभूतिखंड येथील रोहतास प्रेसिडेंशिअल आर्केडमध्ये 1300 चौरस फुटाचे दुकान भाड्यावर घेतले. याच ठिकाणी वेलनेस सेंटर उभारले. ज्योत्स्नाने किरण बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. शिल्पाच्या कंपनीसोबत करारावर साइन करून घेऊ असे सांगितले. तेव्हापासून ते लोक टाळाटाळ करत आहेत.

4 पट महागात साहित्ये विकून लाखो रुपयांना लुटले
ज्योत्स्नाने सांगितले की, सेंटर उघडल्यानंतर आरोपींनी टॉवेलपासून वॉलपेपर पर्यंत आपल्याच मर्जीने लावले. यानंतर कॉस्मेटिक आणि इतर सर्व साहित्ये मुंबईतून मागवले. जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये 5 हजार रुपयांत मिळू शकतात त्यासाठीच 15-15 हजारांप्रमाणे बिल पाठवायचे. काही दिवसांनंतर कंपनीकडून स्वतःचे कर्मचारी लावून सेंटर काबीज केली.

FIR दाखल होताच शिल्पाने शेअर्स विकले
सेंटरवर किरण बाबाने ताबा घेतल्यानंतर ज्योत्स्नाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पण, तोपर्यंत ज्योत्सनाने 1.36 कोटी रुपये गुंतवले होते. आपली एवढी मोठी रक्कम बुडत असल्याचे पाहून तिने विभूतिखंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आपल्या विरोधात पोलीस तक्रार दाखल झाल्याचे ऐकताच शिल्पाने स्टेटमेंट जारी केले. तसेच आपली कंपनी अयोसिसचे शेअर्स किरण बाबाला विकत असल्याचे जाहीर केले. आता आपला या कंपनीशी काहीच संबंध नाही असेही शिल्पाने स्पष्ट केले.

प्रकरणात अडकत चालली आहे शिल्पा शेट्टी
विभूतिखंड पोलिसांनी 19 जून 2020 रोजी या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. परंतु, कित्येक दिवसांपासून कारवाईच केली नाही. त्यानंतर या प्रकरणाचा तपास चिनहट पोलीस स्टेशनमध्ये वळवण्यात आला. याची जबाबदारी पोलिस उपनिरीक्षक अजय शुक्ला यांना देण्यात आली. शुक्ला यांनी सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत झालेल्या चौकशीत फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. ज्योत्स्नाने करार करून घेतला त्यावेळी शिल्पा शेट्टी अयोसिस कंपनीची चेयरपर्सन आणि आई सुनंदा संचालक होती.

बातम्या आणखी आहेत...