आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योगींचे मिशन बॉलिवूड:उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीवर नव्हे 'राम सेतू'वर झाली योगी आदित्यनाथ आणि अक्षय कुमार यांच्यात चर्चा, 90 मिनिटे झाली बातचीत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या भेटीत अक्षयने त्याच्या आगामी 'राम सेतू' या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेशमध्ये करण्याबाबात त्यांच्याशी चर्चा केल्याचे कळते.

उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबई दौ-यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूडमधील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. 1 डिसेंबर रोजी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने हॉटेल ट्रायडेंट येथे जाऊन योगींची भेट घेतली. या भेटीनंतर योगी आदित्यनाथ यांनी अक्षय कुमार सोबत उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर येथील यमुना एक्सप्रेस वे जवळ तयार होणाऱ्या फिल्मसिटीबाबत चर्चा केली, अशी चर्चा रंगू लागली होती.

या 90 मिनिटांच्या भेटीत दोघांमध्ये उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीवर कुठलीच चर्चा झाली नसल्याचे वृत्त ‘पिपिंगमून’ या वेबसाईटने दिले आहे. या भेटीत अक्षयने त्याच्या आगामी 'राम सेतू' या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेशमध्ये करण्याबाबात त्यांच्याशी चर्चा केल्याचे कळते.

अक्षयला यूपीत करायचे आहे ‘राम सेतू’चे चित्रीकरण
अक्षय कुमारने यावर्षी दिवाळीत त्याच्या आगामी 'राम सेतू' या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करुन या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याला याचे चित्रीकरण उत्तर प्रदेशात करायचे आहे. याकरता परवानगी मागण्यासाठी आणि सहकार्य करण्याची विनंती करण्यासाठी अक्षयने योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्याचे पिपिंगमूनने म्हटले आहे. दोघांमध्ये ‘राम सेतू’ चित्रपटाविषयी चर्चा झाली. तर, योगी आदित्यनाथ यांनी अक्षयला अयोध्येत चित्रीकरणाचे आमंत्रण दिले आहे.
योगी यांनी अक्षय कुमारची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो टाकत या भेटीबाबत माहिती दिली. या भेटी दरम्यान त्यांनी अक्षयची प्रशंसा केल्याचे देखील म्हटले जात आहे.अक्षयचे चित्रपट नेहमीच समाजाला प्रेरणा देणारे ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'राम सेतू' या चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रांचे अबुडांडिया एन्टरटेन्मेंट आणि अक्षयचे केप ऑफ गुड फिल्म्स करत आहे.

अभिषेक शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अक्षयचा हा चित्रपट भगवान राम आणि त्यांची जन्मभूमी अयोध्येवर आधारित असल्याची चर्चा आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser