आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओटीटीवर रिलीज:यूपी सरकारने थांबवली सबसिडी, ‘गुलाबो सिताबो’चा निर्माता म्हणाला - ‘आम्हाला फरक पडत नाही’

अमित कर्ण. मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘गुलाबो सिताबो’, ‘गुंजन सक्सेना’, ‘गिन्नी वेड्स सनी’ यांना सबसिडी मिळणे कठीण आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या नऊ महिन्यांपासून चित्रपटगृह बंद होती. त्यामुळे याकाळात अनेक निर्मात्यांनी चित्रपटगृहाच्या ऐवजी आपले चित्रपट डिजिटल प्लेटफॉर्मवर रिलीज केले आहेत. याची किंमत त्यांना उत्तर प्रदेश सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीच्या रूपात भरावी लागू शकते.

सबसिडी मिळणे कठीण

सरकारचे अपर मुख्य सचिव नवनीत सहगलशी जोडलेल्या अधिकृत माहितीनुसार, सिनेमा पाॅलिसीनुसार जे चित्रपट टीव्ही किंवा डिजिटल माध्यमांच्या आधी चित्रपटगृहात रिलीज होतात, त्याच चित्रपटांना सबसिडी मिळते, मात्र यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद झाले. त्यामुळे ‘गुलाबो सिताबो’, ‘गुंजन सक्सेना’, ‘गिन्नी वेड्स सनी’ यांना सबसिडी मिळणे कठीण आहे.

या चित्रपटांची 70 टक्क्यापेक्षा शूटिंग लखनऊ, बनारस, नोएडा आणि ज्याच्या जवळपासच्या भागात झाली आहे. या सर्वांना सबसिडी मिळणार होती, मात्र ओटीटीवर रिलीजमुळे तसे करणे पॉलिसीनुसार शक्य नाही. तरीदेखील मध्यम मार्ग काढला जात आहे. यांच्या निर्मात्यांना चित्रपटगृहात रिलीज करण्यासाठी सहा ते आठ महिन्याची डेडलाइन दिली जात आहे, तेव्हा कुठे काही होऊ शकेल.

निर्माता म्हणतो - आम्हाला फरक पडत नाही

सबसिडीच्या अंतर्गत निर्मात्यांना एकूण खर्चाच्या 25 टक्के रकम दिली जाते. ‘गुलाबो सिताबो’चे निर्माते रॉनी लाहिडीने सांगितले, ‘सबसिडी मिळो किंवा ना मिळाे, काही फरक पडत नाही. आमची कथा लखनऊची होती म्हणून आम्ही तेथे शूट करायला गेलो होतो. सबसिडी घेण्यासाठी आम्ही तेथे शूटिंगसाठी गेलो नव्हतो.

बातम्या आणखी आहेत...