आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांडव वाद:दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशू मेहरा, लेखक गौरव सोलंकी यांचा यूपी पोलिसांनी जबाब नोंदवला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी संध्याकाळी चार पोलिस अधिकारी उत्तर प्रदेशात परतले.

तांडव या वेब सीरिजवरुन उठलेल्या वादंगानंतर शुक्रवारी दिग्दर्शक अली अब्बास जफर, लेखक गौरव सोलंकी आणि निर्माता हिमांशू मेहरा यूपी पोलिसांसमोर हजर झाले होते. दुसरीकडे अ‍ॅमेझॉनचे अधिकारी, सैफ अली खान आणि इतर कलाकारांची चौकशी झाली की नाही याबद्दल अद्याप समजू शकलेले नाही. शुक्रवारी संध्याकाळी चार पोलिस अधिकारी उत्तर प्रदेशात परतले.

तांडवचे निर्माता आणि लेखक यांची चौकशी करताना यूपी पोलिसांची टीम.
तांडवचे निर्माता आणि लेखक यांची चौकशी करताना यूपी पोलिसांची टीम.

अली अब्बास जफरच्या घराबाहेर चिकटवली होती नोटिस

यूपी पोलिसांची हीच टीम एका दिवसापूर्वी अलीच्या घरातून रिकाम्या हाताने परतली होती. पोलिसांची टीम जेव्हा अलीच्या घरी पोहोचली तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते. घरी कुणीही नसल्याने पोलिसांनी त्याच्या घराबाहेर नोटिस चिकटवली होती. या नोटिसमध्ये अलीला 27 जानेवारी रोजी लखनौत चौकशी अधिका-यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

लखनौच्या हजरतगंजमध्ये दाखल झाला होता एफआयआर
तांडव या वेब सीरिजमध्ये झिशान अय्यूबवर चित्रित केलेल्या एका दृश्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर लखनौच्या हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये अ‍ॅमेझॉनच्या कंटेंट हेड, मालिका दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक यांच्यासह अनेक जणांना आरोपी ठरवले गेले. वाढता वाद बघता दिग्दर्शक अली अब्बास जफरने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून माफी मागितली होती.

आक्षेपार्ह दृश्य हटवले
तांडव वादानंतर निर्मात्यांनी मालिकेतील वादग्रस्त सीन हटवला आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमने माहिती आणि प्रसारण मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला होता. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने वेब सीरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशू मेहरा, लेखक गौरव सोलंकी आणि अ‍ॅमेझॉनच्या कंटेंट हेड अपर्णा पुरोहित यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. एफआयआरमधील आरोपींना पुढील तीन आठवड्यांसाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे यूपी पोलिस त्यांना अटक करु शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...