आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तांडव वाद:युपी पोलिसांनी दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या घरावर नोटिस चिकटवली, एका आठवड्यात चौकशीसाठी लखनौत बोलावले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तपास अधिकारी अनिल कुमार सिंग यांनी अली अब्बास जफर यांच्या घराबाहेर एक नोटीस चिकटवली.

सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेल्या 'तांडव' या वेब सीरिजविरोधात लखनौत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान यूपी पोलिस या प्रकरणाच्या चौकशीसाठी सध्या महाराष्ट्रात आले आहेत. तांडवचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्यासह लखनौच्या हजरतगंज येथे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधील सर्व आरोपींची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे हे विशेष पथक मुंबईत दाखल झाले आहे. ही टीम गुरुवारी अली यांच्या घरी पोहोचली तेव्हा तेथे त्यांची भेट झाली नाही. तपास अधिकारी अनिल कुमार सिंग यांनी त्यांच्या घराबाहेर एक नोटीस चिकटवली असून एका आठवड्यात लखनौमध्ये चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे.

अनिल यांनी सांगितल्यानुसार, अली यांना 27 जानेवारी रोजी लखनौत चौकशीसाठी अधिका-यांसमोर हजर होण्यासाठी सांगण्यात आले आहे. तसे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांचे घर कुलूपबंद होते आणि कोणीही त्यांच्या घरी हजर नव्हते, म्हणून नोटीस त्यांच्या घरी चिकटवण्यात आली.

आरोपींना अटक करु शकत नाही टीम याचे कारण म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने वेब सीरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशू मेहरा, लेखक गौरव सोलंकी आणि अ‍ॅमेझॉनच्या कंटेंट हेड अपर्णा पुरोहित यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. एफआयआरमधील आरोपींना पुढील तीन आठवड्यांसाठी वेळ मिळाला आहे.

मुंबईतही एफआयआर दाखल तांडव वादानंतर निर्मात्यांनी माफी मागितली असून मालिकेतील वादग्रस्त सीन हटवण्यात आला आहे. परंतु तक्रारी मागे घेण्यात आलेल्या नाहीत. आमदार राम कदम यांच्या मागणीवरुन मुंबई पोलिसांनी एक दिवस आधीच आयपीसी कलम 153 (A), 295(A) आणि 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तांडव विरोधात पोलिसांत दाखल झालेले हे मुंबईतले पहिले प्रकरण आहे. यापूर्वी लखनौ, नोएडा, रांची आणि मध्य प्रदेशातही एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...