आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी चित्रपट:20 वर्षांनंतर येतोय ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटाचा सिक्वेल, मुख्य अभिनेत्री म्हणून कृती सेनॉनच्या नावावर शिक्कामोर्तब

किरण जैनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जॅकी भगनानी 'रहना है तेरे दिल में'चा सिक्वेल बनवणार

2001 मध्ये रिलीज झालेल्या 'रहना है तेरे दिल में' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. आर. माधवन, दीया मिर्झा आणि सैफ अली खान स्टारर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कदाचित फारशी कमाल दाखवू शकला नसावा, मात्र जेव्हा हा चित्रपट टेलिव्हिजनवर दाखवला गेला तेव्हा लोकांना तो खूप आवडला. मूळ चित्रपट निर्माते वासू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत असल्याचे आता ऐकिवात आले आहे.

जॅकी भगनानी 'रहना है तेरे दिल में'चा सिक्वेल बनवणार
चित्रपटाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, "रहाना है तेरे दिल में ' हा चित्रपट पुन्हा बनवत असताना या चित्रपटात पुन्हा एकदा आर. माधवन, दीया मिर्झा आणि सैफ अली खान यांनाच कास्ट करण्याचा जॅकीचा विचार होता. सुरुवातीच्या योजनेनुसार चित्रपटात 20 वर्षांनंतरची कहाणी दाखवली जाणार होती. जॅकी स्वतः जवळजवळ 1 वर्षापासून या चित्रपटाच्या कास्टिंगवर काम करत आहे. पण, माधवन, सैफ आणि दीयाला पुन्हा एकत्र आणणे त्यांच्यासाठी शक्य झाले नाही. त्यामुळे जॅकीने या तिघांनाही ड्रॉप करत नवीन कलाकारांना एकत्र आणण्याची योजना आखली आहे. सोबतच एका नवीन कथेसह या चित्रपटाचा सिक्वेल सादर करण्याचा निर्णय घेतला आहे."

चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कृती सेनॉनचे नाव झाले अंतिम
सूत्रांनी पुढे सांगितले, "चित्रपटाचे कास्टिंग सुरू झाले आहे आणि क्रिती सेनॉनला मुख्य अभिनेत्री म्हणून फायनल करण्यात आले आहे. यावेळी ही कहाणी एक मुलगी आणि दोन मुलांच्या भोवती फिरणार आहे. अभिनेत्यांची निवड अद्याप बाकी आहे. चित्रपट अगदी सुरवातीच्या टप्प्यावर आहे पण प्रमोशनसाठी निर्माते सैफ, दीया आणि माधवन यांना नक्कीच अप्रोच करणार आहेत."

माधवन आणि दीया यांनी केली होती फिल्मी करिअरची सुरूवात
आर माधवन आणि दीया मिर्झा यांनी 20 वर्षांपूर्वी या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत आपल्या करिअरची सुरूवात केली होती. या चित्रपटानंतर दीया आणि माधवन कोणत्याही चित्रपटात किंवा कोणत्याही प्रोजेक्टमध्ये पुन्हा एकत्र दिसले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...