आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Upcoming Movies And Series In Fabruary: The Family Man 2 To The Girl On The Train,These Big Series And Movies Are Releasing In OTT This Fab

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओटीटी रसिकांसाठी मेजवानी:'द फॅमिली मॅन 2' ते 'द गर्ल ऑन द ट्रेन'सह फेब्रुवारीत या मोठ्या सीरिज आणि फिल्म्स होत आहेत रिलीज

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेब्रुवारीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणते चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत, यावर टाकुयात एक नजर -

2021 या नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात सुमारे 11 मोठे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज झाल्या. आता फेब्रुवारी महिन्यातही ओटीटी रसिकांसाठी मेजवानी घेऊन येत आहे. विविध प्लॅटफॉर्मवर मोठ्या वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज होत आहेत. मनोज बाजपेयीच्या बहुप्रतिक्षित 'द फॅमिली मॅन 2'सह फेब्रुवारीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणते चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत, यावर टाकुयात एक नजर -

हॅलो जी
प्लॅटफॉर्म - अल्ट बालाजी
रिलीज डेट - 1 फेब्रुवारी

नायरा बॅनर्जी स्टारर हॅलो जी ही वेब सीरिज 1 फेब्रुवारी रोजी अल्ट बालाजीवर स्ट्रीम होत आहे. ही एक कॉमेडी ड्रामा सीरिज आहे. यात काही मुलींच्या कथा चित्रित करण्यात आल्या आहेत, ज्या पैसे कमावण्यासाठी स्वतःचे सेक्स कॉलसेंटर सुरु करतात आणि मुलांकडून पैसे लुबाडतात.

लाहौर कॉन्फिडेन्शिअल
प्लॅटफॉर्म - झी 5

रिलीज जेट - 4 फेब्रुवारी

लाहौर कॉन्फिडेन्शिअल ही एक स्पाय थ्रिलर वेब सीरिज आहे जी 4 फेब्रुवारी रोजी झी 5 वर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये करिश्मा तन्ना, रिचा चड्ढा आणि अरुणोदय सिंग मुख्य भूमिकेत आहेत. हा सीरिज एका घटस्फोटित महिलेची कहाणी आहे जी गुप्त मिशनसाठी पाकिस्तानात जाते.

ब्लिस

प्लॅटफॉर्म - अ‍ॅमेझॉन प्राइम

रिलीज डेट - 5 फेब्रुवारी

ब्लिस हा रोमांचक चित्रपट आहे ज्यात एकाच वेळी दोन भिन्न जग दाखवले गेले आहेत. चित्रपटात एका सर्वसामान्य माणसाची कहाणी चित्रीत केली गेली आहे, ज्याचे जीवन एका विचित्र महिलेला भेटून पूर्णपणे बदलते. ती स्त्री म्हणते की ज्या जगात ती राहत आहे ते प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. ती महिला त्या माणसाची ओळख तिच्या जगाशी करुन देते. दोन वेगवेगळ्या जगात वावरत असताना, परिस्थिती आणखी वाईट होते, आणि ती व्यक्ती आपल्या ख-या जगाचा शोध घेऊ लागते.

द फॅमिली मॅन 2

प्लॅटफॉर्म - अ‍ॅमेझॉन प्राइम
रिलीज डेट - 12 फेब्रुवारी

एका दीर्घ प्रतीक्षेनंतर मनोज बाजपेयी स्टारर ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजचे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही सीरिज 12 फेब्रुवारीला अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी श्रीकांत नावाच्या सिक्रेट एजंटची भूमिका साकारत आहेत, जो नोकरी आणि कुटुंबात संतुलन साधण्याचा प्रयत्न करतोय. सीरिजच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

द गर्ल ऑन द ट्रेन
प्लॅटफॉर्म - नेटफ्लिक्स
रिलीज डेट - 26 फेब्रुवारी

रिभू दास गुप्ता दिग्दर्शित ‘द गर्ल ऑफ द ट्रेन’ हा चित्रपट 26 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट याच नावाने रिलीज झालेल्या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा, आदिती राव हैदरी, अविनाश तिवारी आणि कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

ब्रोकन बट ब्युटीफुल 3
प्लॅटफॉर्म - अल्ट बालाजी आणि झी 5

अल्ट बालाजी आणि झी 5 ने अलीकडेच ब्रोकन बट ब्युटीफुल सीरिजच्या तिस-या पर्वाची घोषणा केली होती. बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला आणि सोनिया राथे एका रोमँटिक जोडीच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या मालिकेच्या रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही, जरी ती फेब्रुवारीमध्येच रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...