आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग शो:'इंडियन आयडॉल 12'च्या जागी येतोय 'द कपिल शर्मा शो'; 21 ऑगस्ट रोजी प्रसारित होणार शोचा पहिला एपिसोड, हे सेलेब्स असतील खास पाहुणे

किरण जैन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजय देवगण असेल शोचा पहिला पाहुणा

लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. कपिल शर्माचा हा शो 'इंडियन आयडॉल सीझन 12' या सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोची जागा घेणार आहे. येत्या 21 ऑगस्टला प्रेक्षक कपिलच्या शोचा पहिला एपिसोड बघू शकतील. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमार या शोचा पहिला पाहुणा असेल, अशी चर्चा होती. पण पहिल्या भागात अक्षय नव्हे तर अजय देवगण हजेरी लावताना दिसणार आहे.

अजय देवगण असेल शोचा पहिला पाहुणा
शोचा एक जवळचा सूत्राने सांगितले, "वाहिनीला अक्षय कुमारसोबत शो सुरू करायचा होता, पण अजय देवगणचा 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' हा चित्रपट 13 ऑगस्टला रिलीज होत आहे, तर अक्षय कुमारचा 'बेल बॉटम' 19 ऑगस्टला रिलीज होतोय. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी 'भुज' स्पेशल एपिसोड प्रथम प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे, तर 'बेल बॉटम' ची टीम दुसऱ्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. सध्या, कपिल शर्माच्या टीमने फक्त दोन एपिसोड बँक करुन ठेवले आहेत. नियोजनाप्रमाणे, निर्माते शो प्रसारित होण्यापूर्वी किमान शोचे चार भाग बनवून ठेवतील.'

प्रत्येक एपिसोडमध्ये इन्स्टाग्राम स्पेशल सेगमेंट असेल

कपिलने या सीझनमध्ये 'सोशल मीडिया' स्पेशल सेगमेंट ठेवले आहे. सूत्रांनी पुढे सांगितले, "प्रत्येक एपिसोडमध्ये एक इन्स्टाग्राम स्पेशल सेगमेंट असेल, जिथे कपिल, शोची स्टारकास्ट आणि पाहुणे इन्स्टाग्राम पेजवर प्रेक्षकांच्या कमेंट, फोटोज, लाइव्ह सेशन सारख्या विषयांवर चर्चा करतील. हा एक मजेदार सेगमेंट असेल."

कपिलने शेअर केले होते सेटचे काही फोटो
कपिलने अलीकडेच सोशल मीडियावर शोच्या नवीन सेटचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये 10 स्टार ग्रोसरी स्टोअर, हॉटेल चिल पॅलेस आणि बँक ऑफ बगोडा सारख्या गोष्टी सेटवर दिसल्या. लाईव्ह बँडसाठी एक लहान सेट-अप देखील तयार केले गेले आहे, मध्यभागी निळे क्लाउच ठेवण्यात आले आहेत.

वाणी कपूर, हुमा कुरैशी देखील 'बेलबॉटम'च्या प्रमोशनसाठी लावणार हजेरी

या शोमध्ये अजय देवगणसोबत नोरा फतेही, एमी विर्क आणि शरद केळकर 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहेत. तर अक्षय, वाणी कपूर, हुमा कुरैशी आणि जॅकी भगनानी त्यांचा आगामी 'बेलबॉटम'चे प्रमोशन करताना या शोमध्ये दिसतील. या वर्षी जानेवारीमध्ये कपिल शर्माचा शो काही काळासाठी बंद झाला होता. आता हा शो दमदार कमबॅकसाठी सज्ज आहे.

बातम्या आणखी आहेत...