आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Update: The Final Schedule Of 'Lal Singh Chadha' Will Be Shot In Kargil, Casting Of 60 More Actors; There Will Be More Than 300 Actors In The Entire Film

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपडेट:‘लाल सिंह चड्ढा’चा शेवटचा भाग करगिलमध्ये होणार शूट, आणखी 60 कलाकारांची होत आहे कास्टिंग, संपूर्ण चित्रपटात असतील तब्बल 300 कलाकार

अमित कर्ण16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुलैपर्यंत शूट होणार करगिलच्या युद्धाचे दृश्य, आमिर बरा होण्याची वाट पाहेतय टीम

आमिर खानचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’च्या शेवटच्या शेड्यूलच्या शूटिंगची तयारी पूर्ण झाली आहे. या शेवटच्या भागाच्या शूटिंगसाठी सर्वच कारगिलला जाणार आहेत. ही शूटिंग जुलैपर्यंत पूर्ण होईल. यानंतर कारगिल युद्धाचे दृश्य शूट करण्यात येतील. चित्रपटात लाल सिंह चड्ढासोबत युद्धात भाग घेणाऱ्या लष्करातील जवानाची एक तुकडी दाखवली जाणार आहे, त्यासाठी 50 ते 60 कलाकारांना घेण्यात आले आहे. आता सर्वजण फक्त आमिर कोरोनापासून बरा होण्याची वाट पाहत आहेत.

विजयच्या तारखा शेवटपर्यंत मिळाल्या नाहीत
प्रॉडक्शन हाऊसशी जोडलेल्या टीम मेंबरने सांगितले, चित्रपटात मुख्य पात्राचा एक मित्र बोलका हवा होता. त्यासाठी दक्षिणेतील अभिनेता नागा चैतन्यसोबत चर्चा सुरू आहे. आधी या भूमिकेसाठी विजय सेतुपतीला घेण्यात आले होते मात्र त्याच्या तारखा शेवटपर्यंत मिळाल्या नाहीत.

या भूमिकेसाठी विजयला वजन कमी करायच्या अफवाही पसरल्या होत्या, मात्र ते खरं नव्हतं. विजयच्या जागी दुसरा घेण्यासाठी टीमला खूप मेहनत घ्यावी लागली. यासाठी कास्टिंग टीमला तीन राज्यांत शोध घ्यावा लागला. टीमने बंगाल, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही जाऊन आली होती. शिवाय कोलकातामध्ये 150 पेक्षा जास्त कलाकारांचे ऑडिशन घेण्यात आले. चेन्नईत 70 आणि हैदराबादमध्ये 100 पेक्षा जास्त कलाकारांचे ओपन ऑडिशन घेण्यात आले.

खरं तर चित्रपटात आमिर पंजाबी पात्राच्या भूमिकेत आहे. त्यामुळे पात्राचा मित्र पंजाबी नसावा, असा आदेशच आमिरने दिला होता. त्यामुळे शोधाशोध करावी लागली. दुसरीकडे चित्रपटात आधी माधवन जी भूमिका साकारणार होता ती आता मानव विज करणार आहे. तो आमिरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भूमिकेत असेल.

आईची भूमिका साकारणार मोना सिंह
चित्रपटात आमिरच्या व्यतिरिक्त मोना सिंह आणि करिना कपूर खानदेखील मुख्य भूमिकेत आहेत. सूत्रानुसार, मोना यात आमिरच्या बालपणीच्या पात्राच्या आईची भूमिका साकारणार आहे.

दुसरीकडे करीना यात गायिकेच्या भूमिकेत आहे. तिने गरोदरपणातच आपल्या भागाचे शूटिंग पूर्ण केले होते. आता फक्त चित्रपटाचे युद्धाचे दृश्य चित्रित करण्याचे उरले आहेत.

बातम्या आणखी आहेत...