आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या बोल्ड फॅशनमुळे कायमच चर्चेत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत असतात. पण आता ती तिच्या अतरंगी कपड्यांमुळे नव्हे तर दुस-याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्फी सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत असून तिला दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुबईच्या हॉस्पिटलमधील उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रुग्णालयातील एक व्हिडिओ शेअर करत स्वतः तिच्या आजाराची माहिती दिली आहे. डॉक्टरांनी तिला सध्या न बोलण्याचा सल्ला दिला आहे. उर्फीने सांगितले की, दुबईला पोहोचताच तिला 'लॅरिन्जायटीस' या आजाराची माहिती मिळाली. त्यामुळे तिला दुबईत नीट फिरता आले नाही. सध्या तिला डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले आहे. 'माझा अर्धा खर्च तर या आजारातून बरा होण्यात खर्च झाला,' असे उर्फीने सांगितले आहे.
लॅरिन्जायटिस म्हणजे काय?
लॅरिन्जायटिस हा तसा गंभीर आजार नाही. या आजारात घशाला सूज येते. त्यामुळे स्वरयंत्रणांना त्रास जाणवू लागतो. या आजारामुळे व्यक्तीला बोलण्यासही त्रास जाणवतो. हा आजार झालेल्या व्यक्तीचा आवाज बदलतो किंवा घोगरा होतो. घसा दुखणे, डोकेदुखी, ताप, खोकला ही या आजाराची लक्षणे आहेत. पण योग्येवेळी उपचार घेतले नाही तर गंभीर समस्या उद्भवू शकते.
कोण आहे उर्फी जावेद?
उर्फी ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनौची आहे. 15 ऑक्टोबर 1997 रोजी तिचा जन्म झाला. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर बालपणीच ती मुंबईत आली होती. तिला दोन बहिणी आहेत. उर्फीने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. बिग बॉस ओटीटीमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. 2016 मध्ये तिला 'बडे भैया की दुल्हनिया' मध्ये अवनी पंतची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याशिवाय उर्फीचा 'मेरी दुर्गा' हा सुप्रसिद्ध शो असून यामुळे ती अतिशय लोकप्रिय झाली. याशिवाय तिने बेपनाह, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसोटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमध्येही अभिनय केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.