आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद कायम आपल्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. ती तिचे बोल्ड फोटो इंटरनेटवर शेअर करत असते. तिची ही छायाचित्रे काहींच्या पसंतीस पडतात तर काही जण यावरुन तिला ट्रोल करत असतात. पुन्हा एकदा उर्फी चर्चेत आली आहे. नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि उर्फी चर्चेत आली. भाजप महिल्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदने सोशल मीडियावर अंग प्रदर्शन केल्यामुळे थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर उर्फी देखील सोशल मीडियावर चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देताना दिसत आहे. या दोघींमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. खरं तर उर्फी कोणाचीही पर्वा न करता तिला हवे ते करत असते. ती सोशल मीडियावर जितकी प्रसिद्ध आहे, तितकीच ती स्पष्टवक्ती आहे आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगते. कमाईच्या बाबतीतही ती कुणाच्या मागे नाही.
चला तर मग जाणून घेऊया उर्फीचे कुटुंब, कारकीर्द, संपत्ती अन् आतापर्यंतचा प्रवास...
उर्फी ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनऊची आहे. 15 ऑक्टोबर 1997 रोजी तिचा जन्म झाला. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर बालपणीच ती मुंबईत आली होती. तिला दोन बहिणी आहेत.
उर्फीने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. बिग बॉस ओटीटीमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
2016 मध्ये तिला 'बडे भैया की दुल्हनिया' मध्ये अवनी पंतची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याशिवाय उर्फीचा 'मेरी दुर्गा' हा सुप्रसिद्ध शो असून यामुळे ती अतिशय लोकप्रिय झाली.
उर्फीने 'बेपनाह', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसोटी जिंदगी की' यांसारख्या मालिकांमध्येही अभिनय केला आहे.
उर्फीची कमाई नेमकी किती हे जाणून घ्यायला तिचे चाहते उत्सुक असतात. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी उर्फी कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे. दर महिन्याला ती लाखोंची कमाई करते. एका रिपोर्टनुसार, उर्फी मालिकेच्या एका भागासाठी 25 ते 30 हजार रुपये चार्ज करते आणि दर महिन्याला तिच्या कमाईचा आकडा हा 30 लाखांच्या घरात असतो. तिची एकुण संपत्ती 172 कोटींच्या आसपास आहे.
सोशल मीडियावर उर्फीची अफाट लोकप्रियता आहे. इन्स्टाग्रामवर तिला सुमारे 4 मिलियन लोक फॉलो करतात. सोशल मीडियावर ब्रँड एन्डोर्समेंटमधून ती लाखोची कमाई करते. तिचा मुंबईत एक आलिशान फ्लॅट आहे. शिवाय लग्झरी गाड्यांचेही तिचे स्वतःचे कलेक्शन आहे.
मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी उर्फी एक फॅशन डिझायनर होती.
एका मुलाखतीत उर्फीने एकेकाळी तिचे कुटुंबासोबतचे नाते चांगले नव्हते, असा खुलासा केला होता. काही गैरसमजामुळे तिचे कुटुंबियांशी संबंध बिघडले होते. त्यानंतर जवळपास 2 वर्षे मानसिक त्रासाचा सामना केल्यानंतर उर्फीने स्वतःला संभाळत स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली.
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या बोल्ड फॅशनमुळे कायमच चर्चेत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत असतात. विचित्र डेसिंग सेन्समुळे तिला टीकेचाही सामना करावा लागतो. अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान करत असल्याने अनेकजण तिच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करतात. दरम्यान, आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यादेखील उर्फी जावेदवर चांगल्याच संतापल्या आहेत. उर्फी जावेदला नंगटपणा करणारी बाई म्हणत त्यांनी तिच्या अटकेची मागणी केली आहे. वाचा सविस्तर...
बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या उर्फी जावेदने एक वादग्रस्त विधान केले आहे. मी कधीही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. मी इस्लाम किंवा इतर कोणत्याही धर्माचे पालन करत नाही, असे वक्तव्य उर्फी केले आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.