आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदला जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देणा-या तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी कारवाई करत त्या धमकी देणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. सातत्याने धमकी येत असल्याने या संदर्भात उर्फी जावेदने गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला आणि बिहारमधील पाटणा येथून नवीन गिरी नावाच्या तरुणाला अटक केली आहे. उर्फीच्या तक्रारीनुसार, आरोपी व्हॉट्सअॅप कॉलवर सतत अश्लील भाषेचा वापर करून तिला धमकी देत होता. तसेच आरोपीने तिच्या फॅशन स्टाइलवरही आक्षेप घेतला होता.
पाटण्यातून पोलिसांनी आरोपीला केली अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पाटणा शहरातील नवीन गिरी नावाचा तरुण उर्फीला धमकावत असल्याचे तांत्रिक तपासातून आढळून आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पाटणा येथे जाऊन त्याला बेड्या ठोकल्या. पाटणा पोलिसांच्या मदतीने एका हॉटेलमधून त्याला अटक करून मुंबईत आणण्यात आले आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.'
उर्फी नवीनला आधीपासूनच ओळखते. तिने इन्स्टाग्रामवर सांगितले होते की, नवीन हा तीन वर्षांपूर्वी तिच्या घरचा एजंट होता आणि त्याच्याकडे उर्फीचा फोन नंबरही आहे. तोच तिला अशा पद्धतीचे कॉल आणि धमक्या देत आहे. अश्लील शिव्या देत आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या नंबरवरुन तो तिला त्रास देत असल्याचेही उर्फीने सांगितले होते. उर्फीने तिच्या तक्रारीसोबत कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांना दिले होते. पोलिसांनी नवीनला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध आयटी अॅक्ट आणि धमकावण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी हा रिअल इस्टेट ब्रोकर
पोलिसांनी केलेल्या तपासात नवीन हा रिअल इस्टेट ब्रोकर असल्याचे उघड झाले आहे. काही वर्षांपूर्वी त्याने उर्फीला भाड्याने फ्लॅट मिळवून दिला होता. आरोपीने केलेल्या दाव्यानुसार, उर्फीने त्याचे कमिशन दिले नाही, ज्यामुळे तो अभिनेत्रीला व्हॉट्सअॅपवर वारंवार कॉल करून धमकावत असे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.