आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत राहणारी उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच शाब्दिक चकमक रंगली आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. इतकेच नाही तर जिथे दिसेल तिथे तिचे थोबाड रंगवणार असा इशारादेखील त्यांनी उर्फी जावेदला दिला. पण शांत बसेल ती उर्फी नाही. उर्फीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना चोख प्रत्युत्तर देताना दिसतेय. आता उर्फीने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
उर्फीने भगव्या रंगाचे अतरंगी कपडे परिधान केले आहेत. ‘पठाण’ चित्रपटातील वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर तिने व्हिडिओ बनवला आहे. तिने चित्रा वाघ यांना डिवचण्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी उर्फीला तिच्या या कपड्यांवरुन तिला ट्रोलदेखील केले आहे.
नेटकरी करत आहेत उर्फीला ट्रोल
एकाने कमेंट करत "वाद निर्माण करुन चर्चेत राहण्यासाठी भगव्या रंगाचे कपडे घातले आहेस का?", असा प्रश्न तिला विचारला आहे. "आता पठाणला नव्हे उर्फीला बॉयकॉट करण्याची वेळ आली आहे," अशी कमेंट एकाने केली आहे. तर बॉयकॉट उर्फी, वादाला तोंड फोडू नकोस, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. एका नेटक-याने "प्रसिद्ध होण्यासाठी भगव्या रंगाचे कपडे घातले आहेत. तू तर पॉर्नस्टारला पण मागे सोडलं", अशी कमेंट केली आहे.
चित्रा वाघ यांना काय म्हणाली होती उर्फी चित्रा वाघांच्या इशाऱ्यावर उर्फी जावेदने त्यांच्यावर निशाणा साधला होता. राजकारण्यांना त्यांची कामे नाहीत का? मला कोणीही जेलमध्ये पाठवू शकत नाही. फक्त प्रसिद्धीसाठी सारं सुरुय. माझ्यावर टीकेऐवजी अवैध डान्सबार आणि बेकायदेशीर वेश्याव्यवसाय थांबवण्यासाठी कामे करा, असे उर्फी जावेदने म्हटले होते.
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि आपल्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद शमताना दिसत नाहीये. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या अंगप्रदर्शनावरुन तिला चांगलेच धारेवर धरले आहे. तर उर्फीदेखील त्यांना सातत्याने प्रत्यूत्तर देताना दिसतेय. उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर त्यांनी महिला आयोग उर्फीची दखल का घेत नाही, असा सवाल चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे. तर उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली असून त्यात आत्महत्येचा उल्लेख केला आहे. वाचा या प्रकरणात आतापर्यंत काय काय झाले...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.