आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद जगजाहीर आहे. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी तिला धारेवर धरले आहे. उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत जिथे दिसेल तिथे तिचे थोबाड रंगवणार, असा धमकीवजा इशारा चित्रा वाघ यांनी तिला दिला आहे. पण या धमकीला उर्फी मुळीच घाबरलेली नाही. नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती माझा नंगा नाच असाच सुरू राहणार असे बरळली आहे. असे बिनधास्त वक्तव्य करत तिने चित्रा वाघ यांना जोरदार टोलाच लगावला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
काय आहे व्हिडिओत?
उर्फी नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी पापाराझी तिचे फोटो क्लिक करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी एकाने तिला चाहत्यांकडून मिळणा-या प्रेमाविषयी काय सांगशील, असा प्रश्न विचारला. त्यावर ती "चाहत्यांचे तर ठाऊक नाही, पण माझा नंगा नाच असाच सुरू राहणार," असे बिनधास्तपणे म्हणाली आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी टीका केली आहे.
नुकताच इन्स्टाग्राम शेअर केला होता भगव्या रंगाच्या कपड्यातील व्हिडिओ
उर्फी चित्रा वाघ यांच्याशी थेट पंगा घेताना दिसतेय. यापूर्वी तिने भगव्या रंगाचे अतरंगी कपडे परिधान करत वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअरदेखील केला. तिने चित्रा वाघ यांना डिवचण्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी उर्फीला तिच्या या कपड्यांवरुन तिला ट्रोलदेखील केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.