आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातून पळून दिल्लीत पोहोचली होती उर्फी जावेद:पार्कमध्ये काढल्या होत्या अनेक रात्री, आई आणि दोन बहिणींचा करते सांभाळ

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला पोहोचला आहे. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी तिला धारेवर धरले आहे. तर उर्फीदेखील मागे नाही. तीदेखील सोशल मीडियावर स्वतःचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न करतेय. कधी उर्फीने भगव्या रंगाचे कपडे घालून बेशरम रंग गाण्यावर डान्स केला तर “नंगानाच सुरुच राहील”, असे म्हणत उर्फीने चित्रा वाघ यांन डिवचले होते. आता हा वाद कुठवर जाणार हे तर येणार काळच सांगू शकतो. पण आज सोशल मीडिया सेन्सशन ठरलेल्या उर्फीचे खासगी आयुष्य अनेक खाचखळग्यांनी भरले आहे. घरातून पळून दिल्लीत आल्यानंतर तिने अनेक रात्री पार्कमध्ये काढल्या होत्या. जाणून घेऊया तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच काही...

कोण आहे उर्फी जावेद
उर्फीचा जन्म 15 ऑक्टोबर 1996 रोजी गोमती नगर, लखनऊ येथे झाला. तिने आपले सुरुवातीचे शिक्षण लखनऊच्या सिटी मॉन्टेसरी स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी लखनऊ येथील एमिटी विद्यापीठात तिने प्रवेश घेतला. येथून तिने मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

काही काळापूर्वी आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत उर्फीने सांगितले होते की, जेव्हा ती 11 व्या वर्गात होती, तेव्हा कोणीतरी तिचे फोटो अ‍ॅडल्ट वेबसाइटवर अपलोड केले होते. या कारणावरून वडिलांनी उर्फीचा सुमारे दोन वर्षे शारीरिक आणि मानसिक छळ केला. या काळात तिला नातेवाईक तसेच कुटुंबीयांची साथ मिळाली नाही.

घरातून पळून दिल्लीला पोहोचली होती उर्फी
या मुलाखतीत उर्फीने पुढे सांगितले होते की, तिला नातेवाईकांचेही टोमणे ऐकावले लागले होते. त्यामुळे ती आपल्या दोन बहिणींसह घरातून पळून दिल्लीला आली. येथे जवळपास आठवडाभर एका पार्कमध्ये त्यांनी दिवस काढले. यानंतर तिला एका कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली आणि त्यानंतर त्यांची परिस्थिती थोडी सुधारली.

2015 मध्ये पहिल्यांदा टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले
मुंबईत येण्यापूर्वी उर्फीने दिल्लीतील एका फॅशन डिझायनरची असिस्टंट म्हणून काम केले. त्यानंतर ती मुंबईला आली आणि तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. याकाळात काही फॅशन शोमध्ये तिने रॅम्प वॉकही केला. तिने अनेक मालिकांसाठी ऑडिशन दिली. अखेर 2015 मध्ये तिला 'टेडी मेडी फॅमिली'मधून पहिल्यांदा टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण करण्याची संधी मिळाली.

उर्फीच्या कुटुंबात कोण कोण आहेत?
उर्फीचा जन्म एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. उर्फी जावेदच्या आईचे नाव झाकिया सुल्ताना आहे. तिला दोन धाकट्या बहिणी असून ज्यांची नावे आसफी जावेद आणि डॉली जावेद अशी आहेत. उर्फी अद्याप सिंगल आहे.

या शोजमध्ये झळकली उर्फी

2016 मध्ये तिला 'बडे भैया की दुल्हनिया' मध्ये अवनी पंतची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याशिवाय तिचा 'मेरी दुर्गा' हा सुप्रसिद्ध शो असून यामुळे ती अतिशय लोकप्रिय झाली. उर्फीने 'बेपनाह', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसोटी जिंदगी की' यांसारख्या मालिकांमध्येही अभिनय केला आहे. गेल्या वर्षी बिग बॉस ओटीटीमुळे ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली.

किती आहे उर्फीची संपत्ती
उर्फीची कमाई नेमकी किती हे जाणून घ्यायला तिचे चाहते उत्सुक असतात. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी उर्फी कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे. दर महिन्याला ती लाखोंची कमाई करते. एका रिपोर्टनुसार, उर्फी मालिकेच्या एका भागासाठी 25 ते 30 हजार रुपये चार्ज करते आणि दर महिन्याला तिच्या कमाईचा आकडा हा 30 लाखांच्या घरात असतो. तिची एकुण संपत्ती 172 कोटींच्या आसपास असल्याची चर्चा आहे.

सोशल मीडियावर उर्फीची अफाट लोकप्रियता आहे. इन्स्टाग्रामवर तिला सुमारे 4 मिलियन लोक फॉलो करतात. सोशल मीडियावर ब्रँड एन्डोर्समेंटमधून ती लाखोची कमाई करते. तिचा मुंबईत एक आलिशान फ्लॅट आहे. शिवाय तिच्याकडे एक लग्झरी गाडीदेखील आहे. गाडीची किंमत 25 लाख असल्याचे सांगितले जाते.

  • पुन्हा बरळली उर्फी जावेद!:'माझा नंगा नाच असाच सुरू राहणार' म्हणत चित्रा वाघ यांना लगावला जोरदार टोला

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद जगजाहीर आहे. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी तिला धारेवर धरले आहे. उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत जिथे दिसेल तिथे तिचे थोबाड रंगवणार, असा धमकीवजा इशारा चित्रा वाघ यांनी तिला दिला आहे. पण या धमकीला उर्फी मुळीच घाबरलेली नाही. नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती माझा नंगा नाच असाच सुरू राहणार असे बरळली आहे. असे बिनधास्त वक्तव्य करत तिने चित्रा वाघ यांना जोरदार टोलाच लगावला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पाहा व्हिडिओत काय म्हणतेय उर्फी...

  • उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचले:आता भगवा ड्रेस परिधान करत ‘बेशरम रंग’ गाण्यावर व्हिडिओ बनवला, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

आपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत राहणारी उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच शाब्दिक चकमक रंगली आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. इतकेच नाही तर जिथे दिसेल तिथे तिचे थोबाड रंगवणार असा इशारादेखील त्यांनी उर्फी जावेदला दिला. पण शांत बसेल ती उर्फी नाही. उर्फीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना चोख प्रत्युत्तर देताना दिसतेय. आता उर्फीने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. वाचा सविस्तर...

  • चित्रा वाघ VS उर्फी जावेद:"मी स्वत: जीव तरी देईन", चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर उर्फीची पोस्ट व्हायरल; वाचा आतापर्यंत काय घडले

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि आपल्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद शमताना दिसत नाहीये. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या अंगप्रदर्शनावरुन तिला चांगलेच धारेवर धरले आहे. तर उर्फीदेखील त्यांना सातत्याने प्रत्यूत्तर देताना दिसतेय. उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर त्यांनी महिला आयोग उर्फीची दखल का घेत नाही, असा सवाल चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे. तर उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली असून त्यात आत्महत्येचा उल्लेख केला आहे. वाचा या प्रकरणात आतापर्यंत काय काय झाले...

बातम्या आणखी आहेत...