आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्फी जावेद का घालते तोकडे कपडे?:म्हणाली - मला कपड्यांची अ‍ॅलर्जी, स्वतः व्हिडिओ शेअर करत केला खुलासा

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या तोकड्या कपड्यांमुळे कायम चर्चेत असते. सार्वजनिक ठिकाणी ती अतिशय कमी कपड्यांत हजेरी लावत असते. यामुळे तिला टीकेला सामोरे जावे लागते. सध्या तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्या तोकड्या कपड्यांवरुन तिला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांनी उर्फीला उद्देशून जिथे भेटशील तिथे तुझे थोबाड रंगवेन असे म्हणत तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात सोशल मीडियावर वॉर पाहायला मिळत आहे. पण अशातच आता उर्फीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत ती नेहमीच कमी कपडे का घालते याचे कारण सांगितले आहे.

उर्फीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये व्हिडिओ शेअर केला आहे.
उर्फीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये व्हिडिओ शेअर केला आहे.

उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ती कमी कपडे घालणे हा तिचा नाईलाज आहे असे म्हटले आहे. उर्फीने शेअर केलेल्या व्हिडिओ तिच्या हातावर आणि पायावर पुरळ उठलेले दिसत आहे. अंगावर उठलेली ही अ‍ॅलर्जी दाखवताना उर्फी म्हणाली, "मला बऱ्याचदा विचारले जाते की, तू कमी कपडे का घालतेस पण याचे कारण म्हणजे कपड्यांमुळे होणारी अ‍ॅलर्जी हे आहे. अंगभर कपडे किंवा लोकरीचे कपडे घातले तर मला अ‍ॅलर्जी येते आणि म्हणूनच मी नेहमी कमी कपड्यांमध्ये तुम्हाला दिसते. मला कपड्यांची अ‍ॅलर्जी आहे," असा खुलासा उर्फीने केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

उर्फीने व्हिडिओत तिच्या पायावर आलेले पुरळ दाखवले आहेत.
उर्फीने व्हिडिओत तिच्या पायावर आलेले पुरळ दाखवले आहेत.

यापूर्वी व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली होती - "मी स्वत: जीव तरी देईन किंवा.."
चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यानंतर उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहित त्यात आत्महत्येचा उल्लेख केला होता. "मला माहीत आहे की राजकारण्यांविरोधात असे पोस्ट अपलोड करणे खूप धोकादायक आहे. पण या लोकांमुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. एकतर मी स्वत:चा जीव तरी घेईन किंवा मग माझ्या मनातले बोलेन आणि त्यांच्याद्वारे मारली जाईन. मात्र या सगळ्याची सुरुवात मी केली नाही. मी कधीच कोणासोबत काही चुकीचे केले नाही. ही लोकं विनाकारण माझ्या मागे लागली आहेत", असे उर्फीने लिहिले होते.

घरातून पळून दिल्लीत पोहोचली होती उर्फी जावेद:पार्कमध्ये काढल्या होत्या अनेक रात्री, आई आणि दोन बहिणींचा करते सांभाळ

सध्या उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला पोहोचला आहे. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी तिला धारेवर धरले आहे. तर उर्फीदेखील मागे नाही. तीदेखील सोशल मीडियावर स्वतःचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न करतेय. कधी उर्फीने भगव्या रंगाचे कपडे घालून बेशरम रंग गाण्यावर डान्स केला तर “नंगानाच सुरुच राहील”, असे म्हणत उर्फीने चित्रा वाघ यांन डिवचले होते. आता हा वाद कुठवर जाणार हे तर येणार काळच सांगू शकतो. पण आज सोशल मीडिया सेन्सशन ठरलेल्या उर्फीचे खासगी आयुष्य अनेक खाचखळग्यांनी भरले आहे. घरातून पळून दिल्लीत आल्यानंतर तिने अनेक रात्री पार्कमध्ये काढल्या होत्या. जाणून घेऊया तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच काही...

बातम्या आणखी आहेत...