आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद कायम चर्चेत असते. अतरंगी कपड्यांत अतिशय आत्मविश्वासाने ती मीडियासमोर पोज देत असते. मात्र मंगळवारी उशीरा रात्री चित्र काहीसे वेगळे होते. उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ती विस्कटलेले केस आणि सुजलेले डोळे अशा अवतारात दिसत आहे. एवढेच नाही तर पापराझींना पाहिल्यानंतर ती तोंड लपवून पळताना दिसली.
उर्फी जावेद रात्री उशीरा एका रेस्तराँमध्ये डिनरसाठी पोहोचली होती. यावेळी फोटोग्राफर्स तिचे फोटो क्लिक करण्यासाठी पुढे सरसावले. मात्र नेहमी बिनधास्तपणे कॅमेऱ्यासमोर येणारी उर्फी यावेळी चक्क फोटोग्राफर्सना टाळताना दिसली. यावेळी ती अतरंगी अवतारात नव्हे तर ओव्हरसाइज टी-शर्ट आणि शॉर्ट्सवर दिसली. तसेच तिच्या चेहऱ्यावर अजिबात मेकअप नव्हता. तिचे केस विस्कटले होत आणि डोळे सुजलेले दिसले. ती मास्क लावून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती.
उर्फीचे हे बदलेलेले रुप पाहून सगळेच हैराण झाले. तिच्या या व्हिडिओवर चाहते मजेदार कमेंट्स करताना दिसत आहेत.
उर्फी जावेद ही सध्या भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यामुळे चर्चेत आहे. उर्फीच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आणि या वादाला सुरुवात झाली. चित्रा वाघ यांनी सुरुवातीला त्यांनी ट्वीट करत उर्फीचा समाचार घेतला नंतर या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेत त्यांना पत्र दिलं. त्यात त्यांनी ‘उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी केली होती. यानंतर आता चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात सोशल मीडिया वॉर पाहायला मिळत आहे.
सोशल जाणून घेऊया उर्फीचे कुटुंब, कारकीर्द, संपत्ती अन् आतापर्यंतचा प्रवास...
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या बोल्ड फॅशनमुळे कायमच चर्चेत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत असतात. विचित्र डेसिंग सेन्समुळे तिला टीकेचाही सामना करावा लागतो. अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान करत असल्याने अनेकजण तिच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करतात. दरम्यान, आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यादेखील उर्फी जावेदवर चांगल्याच संतापल्या आहेत. उर्फी जावेदला नंगटपणा करणारी बाई म्हणत त्यांनी तिच्या अटकेची मागणी केली आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.