आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उर्मिला मातोंडकरांचे सडेतोड उत्तर:धर्म परिवर्तन करुन निकाह केल्यावरुन कंगना रनोटने लगावला टोला, उर्मिला म्हणाल्या - तिला माझ्या धर्माची चिंता करण्याची गरज नाही

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उर्मिला आणि कंगना यांच्यात मागील काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरु आहे.

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कंगना रनोट हिच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. कंगनाने अलीकडेच उर्मिला यांनी धर्म परिवर्तन करुन निकाह केल्याचे म्हटले होते. त्यावर सडेतोड उत्तर देताना तिने माझ्या धर्माची चिंता करू नये, असे उर्मिला यांनी म्हटले आहे. कंगनाने सोशल मीडिया एक पोस्ट शेअर करुन उर्मिला यांना उद्देशून लिहिले होते की, "तुम्ही धर्म परिवर्तन करुन निकाह केल्याचे माझ्या ऐकिवात आहे. तरीदेखील तुन्ही अभिमानाने गणपती जी की जय म्हणता, हे पाहून आनंद झाला," अशा आशयाची पोस्ट कंगनाने शेअर केली होती.

प्रत्युत्तरात उर्मिला काय म्हणाल्या?
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार उर्मिला म्हणाल्या, "तिला माझ्या धर्माची चिंता करण्याची गरज नाही. जाणून बुजून धर्मावरुन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेय. आणि असे करुन तिच्याजवळ बोलण्यासाठी मुद्दा नसल्याचे तिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे."

उर्मिला पुढे म्हणाल्या, "तिला वाटते की ती मला बदनाम करुन मला अस्वस्थ करेल. तिने माझे नाव, माझे वैयक्तिक जीवन, माझ्या पतीचे नाव, माझे लग्न, माझ्या सासरच्यांविषयी बोलून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा या सर्व गोष्टींनी माझे मनोबल कमी झाले नाही तर मग या गोष्टीने मला काय फरक पडेल."

उर्मिला म्हणाल्या, "ज्याने काहीही चुकीचे केले नाही तर मग त्याला घाबरण्याचे कारण नाही. मी कधीही सोपा मार्ग निवडला नाही. माझा यावर विश्वास नाही. मी सर्वांना उघडपणे आव्हान देते की ते सिद्ध करा किंवा गुडघ्यावर बसून माफी मागा. मी मागे हटणार नाही."

कशी सुरु झाली शाब्दिक चकमक
उर्मिला यांनी अलीकडेच खार येथे घेतलेल्या 4 कोटी रुपयांच्या नवीन कार्यालयावरून कंगनाने त्यांच्याशी ‘पंगा’ घेतला आहे. ऊर्मिला यांना काँग्रेसमुळे खूप फायदा झाला, अशी खोचक टीका कंगनाने केली आहे. मात्र, राजकारणात सक्रिय होण्यापूर्वीच हे कार्यालय खरेदी केल्याचे सडेतोड उत्तर उर्मिला यांनी दिले आहे.

काँग्रेसमुळे उर्मिला यांना खूप फायदा झाला...
कंगनाने उर्मिला यांच्यावर निशाणा साधत म्हटले, 'भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळाले नाही, पण उर्मिला यांना काँग्रेसमुळे खूप फायदा झाला. उर्मिलाजी, मी स्वतःच्या मेहनतीने घर विकत घेतले होते. पण काँग्रेस माझे घर तोडत आहे, शिवाय भाजपला खुश करून माझ्या हातात फक्त 25 ते 30 न्यायालयातले दावे पडले. मी तुमच्यासारखी समजूतदार असते तर काँग्रेसला खुश केले असते.’

20 वर्षांच्या कारकीर्दीनंतर स्वत:च्या मेहनतीवर खरेदी
उर्मिला यांनीही प्रत्युत्तर देताना म्हटले, 'कंगनाजी, 20- 30 वर्षांच्या कारकीर्दीनंतर 2011 मध्ये स्वत:च्या मेहनतीवर ही संपत्ती विकत घेतली होती. मार्च 2020 मध्ये लॉकडाऊनपूर्वी ती सदनिका विकल्याची कागदपत्रे आणि पुरावे आहेत. त्याच पैशातून मी विकत घेतलेल्या नव्या कार्यालयाचीही कागदपत्रे आहेत. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी झालेल्या व्यवहारातून कार्यालय विकत घेतले आहे.'

खार येथे 1040 चौरस फुटांचे कार्यालय

उर्मिला यांनी खार 1040 चौरस फुटांचे कार्यालय खरेदी केले आहे. या जागेचा दर 36 हजार प्रति चौरस फूट असून या कार्यालयाचा रेडीरेकनर दर 4 कोटींहून अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...