आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया अकाउंट हॅक:मागील 24 तासांपासून उर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक, सायबर सेलने सुरु केला तपास

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एक पथक तयार केले आहे.

अलीकडेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणा-या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले आहे. 24 तास उलटून गेल्यानंतरही त्यांचे अकाउंट रिकव्हर झालेले नाही. त्यांच्या अकाउटंवरील सर्व पोस्ट डिलीट झालेल्या दिसत आहेत. उर्मिला यांनी बुधवारी याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या दुस-या सोशल मीडिया प्रोफाइलच्या माध्यमातून ही माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली.

उर्मिला यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, 'माझे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले आहे. सुरुवातीला ते थेट मेसेज करताना आणि काही स्टेप फॉलो करायला सांगतात. नंतर ते अकाउंट व्हेरिफाय करतात आणि मग ते हॅक होते.'

आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये उर्मिला पुढे म्हणाल्या की, सायबर क्राइमला कोणीही हलक्यात घेऊ नये. अकाउंट हॅक झाल्याची अधिकृत तक्रार नोंदवली असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, 'सायबर क्राइम ही एक अशी गोष्ट आहे ज्याकडे महिलांनी दुर्लक्ष करता कामा नये. इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे गेली असता, मी डीसीपी रश्मी करंदीकर यांना भेटले. त्यांनी मला या गुन्ह्याशी संबंधीत बरीच माहिती दिली. भविष्यात यावर नक्कीच काम करेन.'

उत्तर मुंबईतून झाला होता पराभव

लोकसभा निवडणुकीच्या आधी 27 मार्च 2019 रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन त्यांनी त्तर मुंबईतून कॉंग्रेसच्या तिकिटावर भाजपचे नेते गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी 10 सप्टेंबर 2019 रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहकार्य न केल्याचा आरोप करत पक्ष सोडला. एक वर्ष दोन महिन्यांनंतर आता त्या पुन्हा एकदा राजकारणात आल्या आहेत.

उर्मिला यांचे फिल्मी करिअर
4 फेब्रुवारी 1974 रोजी जन्मलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी 1980 मध्ये आलेल्या 'कलयुग' या चित्रपटाद्वारे बाल कलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. अभिनेत्री म्हणून त्या 1991 मध्ये आलेल्या ‘नरसिम्हा’ या चित्रपटात पहिल्यांदा दिसल्या. 1995 मध्ये रंगीला, 1997 च्या जुदाई आणि 1998 मध्ये आलेल्या सत्या या चित्रपटातील उर्मिला यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली, हे तीनही चित्रपट फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नॉमिनेट झाले होते.

बातम्या आणखी आहेत...