आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

46 वर्षांची झाली रंगीला गर्ल:'रंगीला'मुळे स्टार बनली होती उर्मिला मातोंडकर मात्र एक चुकीमुळे उध्वस्त झाले करिअर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रामू यांनी ऑफिसमधील एका खोलीला दिले होते 'उर्मिला मातोंडकर' नाव

बॉलिवूडची 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर 46 वर्षांची झाली आहे. उर्मिलाने 1980 मध्ये कलयूग या चित्रपटात बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र मासूम या चित्रपटातील भूमिकेमुळे तिला बाल कलाकार म्हणून ओळख मिळाली होती.

नायिका म्हणून तिचा पहिला चित्रपट नरसिम्हा हा होता. पण राम गोपाल वर्मांच्या रंगीलामुळे उर्मिला सिनेसृष्टीत स्टार म्हणून उदयास आली. रंगीला या चित्रपटात एकत्र काम करत असताना राम गोपाल वर्मा उर्मिलाच्या प्रेमात पडले होते. इतकेच नाही तर रामू आपल्या प्रत्येक चित्रपटात उर्मिलाला घेत होते.

एका निर्णयामुळे करिअर झाले उद्धवस्त

राम गोपाल वर्मा यांच्याच चित्रपटात काम करत असताना उर्मिलाने इंडस्ट्रीतील अनेक दुस-या दिग्दर्शकांसोबत काम करण्यास नकास दिला होता. शिवाय रामू यांचेही इंडस्ट्रीतल लोकांशी फारसे पटत नसल्याने दिग्दर्शकांनीही उर्मिलाला चित्रपटात घेणे बंद केले. हळूहळू उर्मिलाला चित्रपट मिळणे बंद झाले आणि तिचे करिअर उध्वस्त झाले.

रिपोर्ट्सनुसार, एकदा उर्मिलासाठी राम गोपाल वर्मा यांनी माधुरी दीक्षितला त्यांच्या चित्रपटातून काढून टाकले होते. या घटनेनंतर रामू उर्मिलाच्या प्रेमात असल्याने ते उर्मिलालाच चित्रपटात हिरोईन म्हणून घेतात, यावरुन पडदा उचलला गेला होता. ही गोष्ट जेव्हा उर्मिलाला समजली, तेव्हा तिने रामू यांचे प्रपोजल फेटाळून लावले होते. इतकेच नाही तर उर्मिलाने राम गोपाल वर्मांबरोबर चित्रपट करणेही बंद केले होते.

रामूने साउथच्या चित्रपटांतही केले होते कास्ट

'रंगीला'पूर्वी राम गोपाल वर्मा यांनी उर्मिलाला दक्षिणेतील 1992 च्या 'अंथम' आणि 'द्रोही' या चित्रपटांसह 1993 च्या 'गायम' या चित्रपटात संधी दिली होती.

रामू यांनी ऑफिसमधील एका खोलीला दिले होते 'उर्मिला मातोंडकर' नाव

राम गोपाल वर्मा उर्मिलाच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले होते की त्यांनी मुंबईतील अंधेरीस्थित त्यांच्या ऑफिसच्या एका रुमला 'उर्मिला मातोंडकर' असे नाव दिले होते. रामूच्या ऑफिसच्या ग्राऊंड फ्लोअरवर 15 खोल्या आहेत. ज्याचा वापर एडिटिंग, पोस्ट प्रॉडक्शन, साऊंड डिपार्टमेंटसाठी होतो.

राम गोपाल यांच्यासह 13 चित्रपटांमध्ये काम केले
उर्मिलाने राम गोपाल वर्मा यांच्यासह एकूण 13 चित्रपटांत काम केले. यात अंथम, द्रोही, गायम, अंगनगा ओका राजू (सर्व तेलुगु चित्रपट), रंगीला, दौड, सत्या, कौन, मस्त, जंगल, कंपनी, भूत आणि आग या चित्रपटांचा समावेश आहे.

ऑफ बीट चित्रपटांमध्येही झळकली
राम गोपाल वर्मा यांची साथ सोडल्यानंतर उर्मिलाने काही ऑफबीट चित्रपटांमध्ये काम करण्याचा प्रयत्नही केला. यामध्ये पिंजर आणि मैंने गांधी को नहीं मारा या चित्रपटांचा समावेश आहे. परंतु उर्मिलाचा प्रयत्न अयशस्वी झाला. हे चित्रपट फ्लॉप ठरले होते.

9 वर्षांनी लहान काश्मिरी व्यावसायिकासोबत केले लग्न
3 मार्च, 2016 रोजी उर्मिला मातोंडकरने तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान असलेल्या काश्मिरी व्यावसायिक मोहसीन अख्तर मीरशी लग्न केले. उर्मिला बर्‍याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. 2018 मध्ये आलेल्या 'ब्लॅकमेल' चित्रपटामधील 'बेवफा ब्यूटी' या आयटम साँगमध्ये ती दिसली होती.

राजकारणात ठरली अयशस्वी
उर्मिलाने राजकारणातही नशीब आजमावले, पण त्यात ती अपयशी ठरली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होत. तिने उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु भाजपचे उमेदवार गोपाल शेट्टी यांच्याकडून तिचा पराभव झाला होता. 5 महिन्यांनंतरच तिने कॉंग्रेसला सोडचिट्ठी दिली होती.

बातम्या आणखी आहेत...