आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Urmila Matondkar Said I Too Have Faced A Lot Of Nepotism In My Career; 16 17 Girls Took Entry With Me That Year, Many Of Whom Were Associated With Big Names In The Industry.

नेपोटिझमवर 'रंगीला गर्ल'चे मत:उर्मिला मातोंडकर म्हणाली- मीसुद्धा नेपोटिझमचा तीव्र सामना केला आहे; त्यावेळी 16 ते 17 अभिनेत्री माझ्यासोबत आल्या होत्या, त्यापैकी अनेक जणी कुणाच्या ना कुणाच्या नात्यात होत्या

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उर्मिला मातोंडकर म्हणाली - मी स्वतः घराणेशाहीचा सामना केला आहे. आणि यावर मात केली आहे.

अलीकडेच कंगना रनोटने अभिनेत्री आणि राजकारणी उर्मिला मातोंडकरवर तिच्या संघर्षाचा अवमान केल्याचा आरोप केला होता आणि तिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणून संबोधले होते. तर उर्मिलाच्या मते, या इंडस्ट्रीमध्ये तिनेही बराच संघर्ष केला आणि तिलादेखील घराणेशाहीला सामोरे जावे लागले होते. इतकेच नाही तर तिच्याविषयी नको ते लिहिले गेले होते.

एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखती दरम्यान उर्मिला म्हणाली की, 'आम्ही सर्वांनी संघर्षाला तोंड दिले आहे. मी स्वतः एका मध्यमवर्गीय मराठी पार्श्वभूमीतून आले आहे. मी स्वतः घराणेशाहीचा सामना केला आहे. आणि यावर मात केली आहे.'

  • करिअरच्या सुरुवातीला नेपोटिझम सहन केले

उर्मिला म्हणते, जर मी 'नेपोटिझम' या शब्दावर बोलण्यास सुरूवात केली तर मी अनेक तास त्याविषयी बोलू शकते. हिंदी सिने सृष्टीत घराणेशाही ही चंद्र आणि सूर्या इतकीच लख्ख आहे. एक अभिनेत्री असल्याचा, मराठी असल्याचा मी त्रास सहन केला आहे, मी अनेक गोष्टी भोगल्या आहेत. मी त्यावेळी नेपोटिझमबद्दल बोलले नाही. मात्र आत्ता मी या सगळ्या गोष्टी बोलते आहे. त्यावेळी मराठी लोकांना घाटी असेही संबोधले जात होते. त्या काळात नेपोटिझमचा मी मोठ्या प्रमाणावर सामना केला, असे उर्मिलाने स्पष्ट केले.

  • 16-17 नवीन मुलींसह पदार्पण केले होते

1999 मध्ये 'नरसिम्हा' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पणानंतर उर्मिलाला घराणेशाहीचा सामना करावा लागला होता. याविषयी ती म्हणते, 90 च्या दशकात 16 ते 17 अभिनेत्री माझ्यासोबत आल्या होत्या. त्यातल्या 11 ते 12 नट्या या कुणाच्या ना कुणाच्या नात्यात होत्या. यात करिश्मा कपूर, रवीना टंडन, पूजा भट्ट, काजोल ही काही नावे आहेत.

  • मला इंडस्ट्रीचे नियम माहित नव्हते

ती पुढे म्हणाली की, 'रंगीलापूर्वी माझ्याबद्दल बर्‍यापैकी नको ते लिहिले गेले होते. 'नरसिम्हा'द्वारे माझी खूप चांगली सुरुवात झाली होती, लोकांनी मला पसंत केले होते. माझ्या डान्स आणि अभिनयाचे कौतुक झाले होते. पण मला वाटतं की इंडस्ट्रीतून मला जास्त पाठिंबा नव्हता. कारण चित्रपटांची पार्श्वभूमी नसलेली मी एक आऊटसाइडर होती. मला येथील नियम माहित नव्हते. '

  • माझ्याबद्दल बर्‍यापैकी वाईट लिहिले गेले होते

'मीडियाला आनंदी कसे ठेवायचे हे मला माहित नव्हते. त्यावेळी ही मोठी गोष्ट होती. माझ्याबद्दल बरेच वाईट लिहिले गेले होते. माझे खच्चीकरण करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यावेळी माध्यमांव्यतिरिक्त, इंडस्ट्रीतील बरेच लोक यात सामील होते.'

ती म्हणाली, 'ज्यावेळी मी रंगीला करीत होते, त्यावेळी मला अशा पद्धतीने नाकारले गेले होते जे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कधीही कुणासोबत घडले नसेल. रंगीला हा चित्रपट मी केला तेव्हा अनेकांना वाटले की मी त्यात अभिनय केलाच नाही मी फक्त छोटे कपडे घालून नाचले. अनेक लोकांनी त्यावेळी असाच समज करुन घेतला होता.'

View this post on Instagram

💕💕💕

A post shared by Urmila Matondkar (@urmilamatondkarofficial) on Jun 8, 2019 at 8:43pm PDT