आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उर्मिलाचा कंगनाला टोला:कंगनाने मुंबईला म्हटलं लाडकं शहर, टोला लगावत उर्मिला मातोंडकर म्हणाल्या - 'बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ?'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही, असे म्हणत कंगनाने शिवसेनेला डिवचले होते.

अभिनेत्री कंगना रनोट अलीकडेच मनालीहून मुंबईत आली. मुंबईत पोहोचल्यानंतर कंगना लगेचच सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला पोहोचली. यावेळी तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबईत राहण्यासाठी आपल्याला कोणाच्या परवानगीची गरज नाही म्हणत पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेळी ती म्हणाली, "मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. फक्त गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि परवानगी हवी आहे. ती मिळाली आहे. अजून कोणाकडे मी परवानगी मागितलेली नाही." इतकेच नाही तर यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुंबईचा उल्लेख लाडकं शहर म्हणून केला. "माझ्या लाडक्या मुंबई शहरासाठी उभं राहिल्यानंतर शत्रुत्वाचं प्रमाण आश्चर्यचकित करणारं होतं. आज मी मुंबादेवी आणि सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. मला सुरक्षित आणि स्वागत केल्यासारखं वाटत आहे", असे ती म्हणाली होती.

उर्मिला मातोंडकर यांनी लगावला टोला
काही दिवसांपूर्वी मुंबईची पाकव्याप्त काश्मिरशी तुलना केल्यानंतर आता मुंबईला लाडकं शहर म्हणणा-या कंगनाला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी टोला लगावला आहे. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असा मिश्किल सवाल करत उर्मिला यांनी कंगनाचे नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे.

माझ्या प्रिय मुंबई शहराच्या पाठी उभं राहण्यासाठी असं म्हणत उर्मिला यांनी बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का भाऊ..., असा सवाल केला. उर्मिला यांनी याआधीही कंगनावर हल्लाबोल केला होता.

104 दिवसांनी मुंबईत परतली कंगना
कंगना रनोट एका मोठ्या ब्रेकनंतर मनालीहून मुंबईला परतली आहे. कंगना तिची थोरली बहीण रंगोली आणि भाचा पृथ्वीराज यांच्यासह मुंबई विमानतळावर दिसली होती. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी अनेक सुरक्षा रक्षकसुद्धा त्यांच्यासह व्हिडिओमध्ये दिसले. कंगना 104 दिवसांनी मुंबईला परतली आहे. तत्पूर्वी, शिवसेनेशी झालेल्या वादामुळे कंगनाने 9 सप्टेंबरला मुंबई गाठली होती. पाच दिवस मुंबईत राहिल्यानंतर ती 14 सप्टेंबरला मनालीला रवाना झाली होती.

मुंबईत आल्यानंतर कंगनाने केलेली सोशल मीडिया पोस्ट...

बातम्या आणखी आहेत...