आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडमधून राजकारणात प्रवेश करणा-या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे अलीकडेच इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते. त्यानंतर ते रिस्टोर केले गेले. आता उर्मिला यांनी बरखा दत्त यांना दिलेल्या एका मुलाखतीत आपली व्यथा मांडली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, त्यांचे पती मोहसीन अख्तर मीर सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे.
उर्मिला म्हणाल्या, "माझे पती मोहसीन अख्तर मीर यांच्याबद्दल सोशल मीडियावर उलट सुलट अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांना दहशतवादी आणि पाकिस्तानी म्हटले जात आहे. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. काही लोकांनी माझ्या विकिपीडिया पेजवर बदल केले. त्यात माझ्या आईचे नाव रुखसाना अहमद आणि वडिलांचे नाव शिवेंद्र सिंह करण्यात आले. हे दोन लोक देशात कोठे राहतात हे मला माहित नाही. माझ्या वडिलांचे नाव श्रीकांत मातोंडकर आणि आईचे नाव सुनीता मातोंडकर आहे,'' असे त्यांनी सांगितले.
'माझा नवरा काश्मिरी मुस्लिम आहे'
उर्मिला पुढे म्हणाल्या, "माझा नवरा केवळ मुस्लिमच नाही तर काश्मिरी मुस्लिम आहे. आम्ही दोघेही आपल्या धर्माचे पालन करतो. म्हणूनच लोक सतत माझे पती आणि त्याच्या कुटुंबाला ट्रोल करत आहेत. मला वाटते की स्त्रिया खूपच संवेदनशील असतात आणि हीच गोष्ट त्यांना बळकटी देते.'
उर्मिला यांनी सप्टेंबर 2019 मध्ये काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी दिली होती. अलीकडेच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.