आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडमध्ये अभिनयातून मन जिंकणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला तामिळ सिनेमात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तिच्या या चित्रपटाचे नाव अजून फायनल झाले नाही, मात्र याचे शूटिंग सुरू झाले आहे.
सूत्रानुसार, उर्वशीने या मेगा चित्रपटासाठी 10 कोटी रुपये घेतले आहेत. सोबतच ती दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रानंतर दक्षिणेतील सर्वात महागडी अभिनेत्रीच्या यादीत सहभागी झाली आहे. यापूर्वी 2014 मध्ये दीपिका पदुकाेणने रजनीकांतसोबत ‘कोचादियान’ हा चित्रपट आणि प्रियांकाने 2002 मध्ये तामिळ चित्रपट ‘तमीजान’ केला होता.
मायक्रोबायोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार
उर्वशीचा हा बिग बजेट चित्रपट असून तो विज्ञानावर आधारित चित्रपट आहे, त्यात ती मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एका आयआयटीयनच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट अनेक भाषेत रिलीज होणार आहे.
उर्वशी नुकतीच मनालीमध्ये याच्या शूटिंगसाठी दिग्गज अभिनेते सरवनन यांच्यासोबत दिसली होती. निर्मात्यांनी अजून चित्रपटाचे शेड्यूल ठरवले नाही, त्यापूर्वी आलिया भट्टदेखील यात दिसू शकते, अशी अफवा पसरली होती. मात्र अजून इतर कलाकारांची नावे समोर आली नाहीत.
गुरु रंधावाच्या म्युझिक अल्बममध्ये दिसणार उर्वशी
दुसरीकडे तामिळ चित्रपटासोबतट उर्वशी 'ब्लॅक रोज'मधून तेलुगूमध्येही पदार्पण करणार आहे. त्याचा फर्स्ट लूक आधीच समोर आला आहे. याशिवाय तिच्याकडे इतर प्रोजेक्ट्सदेखील आहेत. ती 'थिरुतु
पायाले 2' मध्येही दिसणार आहे. तो तामिळ सुपरहिट चित्रपटाचा रिमेक आहे. याशिवाय तिच्याकडे वेब सीरिज 'इन्स्पेक्टर अविनाश' आणि 'वर्साचे' हा अल्बमदेखील आहे. सोबतच ती गुरु रंधावाच्या 'मर
जाएंगे' या अल्बममध्येही रोमान्स करताना दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.