आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री उर्वशी रौतेलाने न्यू इयर पार्टीमध्ये 15 मिनिटांच्या सादरीकरणासाठी उर्वशी रौतेलाने 4 कोटी रुपये मानधन घेतले आहे. 31 डिसेंबरच्या रात्री दुबईच्या पंचतारांकित हॉटेल प्लाजो वर्सस येथे ही पार्टी होणार आहे. या पार्टीत उर्वशी तिच्या चाहत्यांशीही संवाद साधणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन तिने ही माहिती दिली आहे.
अभिनेत्रीचा इंटरनॅशनल प्रोजेक्ट
उर्वशी लवकरच इजिप्शियन अभिनेता मोहम्मद रमादानसोबत एका प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने रमादानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. "मी आगामी आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये इजिप्तचा अभिनेता मोहम्मद रमादानसोबत शूट करत आहे. त्याआधी मी एक प्रोजेक्ट गमावला आहे. मी खूप आनंदी आणि आभारी आहे मला ही संधी पुन्हा मिळाली. तुमच्या सर्वांच्या प्रेम व आशीर्वादांबद्दल धन्यवाद," अशी पोस्ट तिने लिहिली होती.
शाहरुखनंतर रमादान फक्त उर्वशी ओळखतो
इजिप्शियन अभिनेता मोहम्मद रमादानने सांगितल्याप्रमाणे, तो बॉलिवूडमध्ये शाहरुख खान नंतर फक्त उर्वशी रौतेलाला ओळखतो. त्याने अभिनेत्रीचे कौतुक करताना म्हटले की, "उर्वशी ही बॉलिवूडची तरूण सुपरस्टार आहे, तिची प्रसिद्धी कमालीची आहे. ती भारतीय सौंदर्याचे एक उदाहरण आहे. मला खात्री आहे की आपण लवकरच तिला हॉलिवूड प्रोजेक्ट करताना पहाल. उर्वशीसोबत फेब्रुवारीपासून आमच्या प्रोजेक्टबद्दल बोलणी सुरु होती. परंतु कोरोना स्पीड ब्रेकर बनला. उर्वशीबरोबर काम करायला मिळाल्याने मला खूप आनंद झाला. "
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.