आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया आणि युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या युक्रेनमध्ये तिच्या 'द लीजेंड' या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. स्वतः उर्वशीने रविवारी सोशल मीडियावर युक्रेनमधील तिचे 2 व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी युक्रेनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे.
उर्वशी रौतेलाने पहिला व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "आपल्या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी मॉर्निंग वॉक हा दिवसभरासाठी वरदान आहे." दुसऱ्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उर्वशीने लिहिले, "तुमच्या फोनवरुन डिस्कनेक्ट होणे आणि शूटिंगपूर्वी ताज्या हवेचा आनंद घेणे, यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. प्रत्येक आयुष्य अनमोल आहे. निसर्गासारखे व्हा आणि जज न करता प्रत्येकावर प्रेम करा. #workdiaries ."
उर्वशी मायक्रो बायोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे
या दोन्ही व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानच्या 'जब तक है जान' चित्रपटातील प्रसिद्ध संवाद ऐकू येत आहे. याशिवाय उर्वशीने तिच्या सोशल मीडिया स्टोरीवर युक्रेनमधील तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. उर्वशी व्यतिरिक्त जेडी आणि जेरी या जोडीने दिग्दर्शित केलेल्या 'द लीजेंड' या तामिळ चित्रपटात सरवना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. उर्वशी या चित्रपटात आयटीटीच्या मायक्रो बायोलॉजिस्टची भूमिका साकारत आहे. उर्वशीही या चित्रपटाद्वारे तामिळ इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.
उर्वशी रौतेलाचे आगामी प्रोजेक्ट्स
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 'द लीजेंड' व्यतिरिक्त उर्वशी रौतेला लवकरच जिओ स्टुडिओजची वेब सीरिज 'इन्स्पेक्टर अविनाश'मध्ये रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय उर्वशी 'ब्लॅक रोज' या थ्रिलर चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2017 च्या 'थिरुट्टू पायले 2' चा तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.