आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया आणि युक्रेनचे वाद आता चिघळतच चालला आहे. दरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या युक्रेनच्या दौऱ्यावर असून, अपकमिंग प्रोजेक्ट 'द लीजेंड' या चित्रपटाची शुटिंग सुरू आहे. या माहिती स्वत: उर्वशीने दिली असून, तिने सोशल मीडियावर दोन व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. या व्हिडिओत उर्वशी युक्रेनच्या रस्त्यांवर फिरताना पाहायला मिळत आहे.
उर्वशीने आपल्या पहिल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की, "आपल्या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी सकाळी लवकर उठून निसर्ग वातावरणात फिरणे हे दिवसभरासाठी वरदान आहे." तर दुसऱ्या एका व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उर्वशीने लिहले आहे की, "बातम्या आणि तुमचा फोन डिस्कनेक्ट असताना, शूट करण्यापूर्वी ताजी हवेचा आनंद घेण्यापेक्षा मोठे आनंद असूच शकत नाही. प्रत्येकाचे जीवन महत्त्वाचे आहे. निसर्ग माते सारखे व्हा आणि निर्णय न घेता प्रत्येकावर प्रेम करा." असे उर्वशीने म्हटले आहे.
उर्वशी मायक्रो बायोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार
उर्वशीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या दोन्ही व्हिडिओत शाहरुख खानच्या 'जब तक हैं जान' या चित्रपटातील फेमस डायलॉग ऐकू येत आहेत. यासोबत उर्वशीने युक्रेनच्या भुमीवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहे. जेडी आणि जेरी या जोडीने दिग्दर्शित केलेल्या 'द लीजेंड' या तामिळ चित्रपटात सरवाना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. उर्वशी या चित्रपटात आयटीटीच्या मायक्रो बायोलॉजिस्टची भूमिका साकारत आहे. उर्वशीही या चित्रपटाद्वारे तमिळ इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.
अपकमिंग प्रोजेक्ट द लीजेंड
उर्वशी रौतेला लवकरच 'द लीजेंड' यासह जियो स्टूडियोजच्या 'इंस्पेक्टर अविनाश' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. याव्यतिरिक्त 'ब्लॅक रोज' या चित्रपटात देखील उर्वशी मुख्य भुमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या तामिळ फिल्म 'थिरुट्टू पायले2'चा हिंदी रीमेक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.