आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतला भेटण्यासाठी पोहोचली उर्वशी रौतेला?:शेअर केला रुग्णालयाचा फोटो, ट्रोल करत नेटकरी म्हणाले - हिला उपचारांची गरज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

30 डिसेंबर 2022 रोजी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता. तेव्हापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 4 जानेवारी रोजी त्याला डेहराडूनहून विमानाने मुंबईत आणण्यात आले. आता त्याच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान, अभिनेत्री उर्वशीने पुन्हा एकदा ऋषभशी संबंधित एक गुढ पोस्ट शेअर केली आहे. उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ऋषभ ज्या रुग्णालयात दाखल आहे त्याचा फोटो पोस्ट केला आहे. उर्वशीच्या या पोस्टनंतर ती ऋषभला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यानंतर नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

उर्वशी पंतला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचली?
नेटकऱ्यांच्या मते, उर्वशीने रुग्णालयात जाऊन ऋषभ पंतची भेट घेतली. खरं तर एकेकाळी ऋषभ आणि उर्वशी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण नंतर त्यांनी या वृत्तांचे खंडन केले होते. त्यांच्या नात्यापेक्षा त्यांच्यातील शीतयुद्ध निश्चितच चर्चेत राहिले आहे.

उर्वशी रौतेलावर भडकले नेटकरी
ऋषभरच्या भीषण अपघातानंतर उर्वशीची वागणूक बघून नेटकरी अतिशय नाराज झाले आहेत. ऋषभच्या नावाचा वापर करुन उर्वशी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतेय, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.उर्वशीने रुग्णालयाचा फोटो पोस्ट केल्यानंतर एका यूजरने लिहिले- "एका गरजू महिलेला उपचाराची गरज आहे, ती हॉस्पिटलबाहेर मदतीची याचना करत आहे, पण तिच्यावर उपचार होत नाहीत." तर दुसऱ्या युजरने लिहिले - "हा मानसिक छळ आहे. उर्वशीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, ती पंतला टॉर्चर करत आहे."

ऋषभ पंतच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उर्वशी रौतेलाने एक पोस्ट शेअर केली होती. उर्वशीने स्वतःचा एक फोटो पोस्ट करत ‘प्रार्थना करत आहे,’ असे कॅप्शन दिले होते. यावर नेटकऱ्यांनी तिला सुनावले होते. एकाने लिहिले की, "येथे ऋषभचा अपघात झाला आहे आणि तुला ड्रेस अप करावे लागले." तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘भाई हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुम्ही इथे फोटो पोस्ट करत आहात.” आणखी एक जण म्हणाला, “वहिनी लाज वाटते. ऋषभ भाऊ रुग्णालयात आहेत आणि तुम्ही हॉट फोटो पोस्ट करत आहात." एकाने लिहिले, "कोण पांढऱ्या पोशाखात प्रार्थना करते." आणखी एका लिहिले होते, "अपघाताच्या वेळी अशी पोस्ट टाकणे तुम्हाला शोभत नाही."

उर्वशीच्या आईने पंतसाठी केली प्रार्थना
ऋषभचा अपघात झाल्यानंतर उर्वशीची आई मीरा रौतेला यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर करत लिहिले होते, "सोशल मीडियावरची अफवा एका बाजूला आणि तुझी तब्येत एका बाजूला. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तराखंडचे नाव प्रकाशमान करणे दुसऱ्या बाजूला. सिद्धबलिबाबा तुझ्यावर विशेष कृपा करो. तुम्ही सर्व देखील प्रार्थना करा."

काय आहे संपूर्ण प्रकरण?
ऋषभ पंतचा 30 डिसेंबर रोजी रुरकीच्या नरसन सीमेवरील हम्मादपूर झालच्या वळणावर पहाटे 5.30 वाजता अपघात झाला होता. गाडी चालवताना डुलकी आल्याने त्याचे मर्सिडीजवरील नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकाला धडकली. हे ठिकाण त्याच्या घरापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. त्यावेळी कारचा वेग ताशी 150 किमी होता.

उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्यात का झाला होता वाद?
मीडिया रिपोर्टनुसार, उर्वशी आणि ऋषभ पंत यांचे 2018 मध्ये ब्रेकअप झाले आहे. काही दिवसाआधी उर्वशी आणि पंत यांच्यात वाद सुरू झाला. एका मुलाखतीत उर्वशीने सांगितले होते की, मिस्टर आरपी तिला भेटायला आले होते, पण तिने नकार दिला. यानंतर तिने आरपीचा फोनही उचलला नाही.
मुलाखतीत उर्वशी म्हणाली होती की 'वाराणसीमध्ये शूटिंग करून मी दिल्लीला आले होते, जिथे माझा शो होणार होता. मी दिवसभर शूटिंग केले. तिथे आरपी मला भेटायला आले होते आणि ते लॉबीमध्ये माझी वाट पाहत होते. 10 तासांच्या शूटिंगनंतर मी परत आले तेव्हा मी थकले होते आणि झोपी गेलो. मला कितीतरी वेळा फोन आला, पण मला कळले नाही. मला जाग आली तेव्हा मला 16-17 मिस्ड कॉल्स दिसले. तेव्हा मला खूप वाईट वाटले. मग मी त्यांना म्हणालो की तुम्ही मुंबईला आल्यावर भेटू.'

ऋषभ पंतने घेतला होता उर्वशीचा समाचार
यावर ऋषभ पंतने उर्वशीचा समाचार घेतला होता. "काही लोक मुलाखतींमध्ये खोटे बोलतात जेणेकरून ते लोकप्रियता मिळवू शकेल. काही लोक लोकप्रियतेचे भुकेले आहेत हे किती वाईट आहे. देव त्यांना सुखी ठेवो. खोट्यालाही मर्यादा असतात,' असे ऋषभ पंतने उर्वशीची मुलाखत समोर आल्यानंतर म्हटले होते. मात्र पंतने नंतर पोस्ट डिलीट केली होती. दरम्यान, यानंतर उर्वशीने एक पोस्ट करत छोटू भैय्याने बॅट बॉल खेळायला हवे. मी काही मुन्नी नाही जी तुझ्यासाठी बदनाम होईल, असे म्हटले होते.

  • ऋषभ पंतच्या भीषण अपघातानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट:म्हणाली - 'प्रार्थना करत आहे', नेटकरी म्हणाले - 'हेच खरे प्रेम आहे'

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून घरी येत असताना भरधाव वेगात असणाऱ्या पंतच्या कारला हा भीषण अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने रुडकी येथील नारसन सीमेवर हम्मदपूर झालजवळील वळणावर ऋषभ पंतची भरधाव कार रेलिंगला धडकली. त्यानंतर कारला आग लागली. सध्या पंतवर देहरादूनमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. तो लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहे. त्यातच आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाने एक पोस्ट शेअर केली आहे. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...