आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके (कृष्ण कुमार कुन्नाथ) यांचे मंगळवारी वयाच्या 53 व्या वर्षी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झाले. पार्श्वगायक केके यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
केके यांनी आपल्या करिअरची सुरुवात जिंगल्स गाऊन केली होती. केके यांना एआर रहमान यांनी चित्रपटांमध्ये गाण्यासाठी ब्रेक दिला होता, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. केके यांच्या दमदार आवाजामुळे त्यांचा जबरदस्त चाहतावर्ग होता.
90 च्या दशकापासून त्यांनी आपल्या गायनाने लोकांना वेड लावले होते. केके यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर लोक त्यांचे स्मरण करत आहेत. त्यांचे चाहते त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या रिपोर्टमध्ये जाणून घेऊया कशी होती केके यांची लाइफस्टाइल आणि त्यांची एकूण संपत्ती -
लाइव्ह कॉन्सर्टसाठी 10 ते 15 लाख रुपये घ्यायचे मानधन
केके यांनी आपल्या कारकिर्दीत 2500 हून अधिक गाणी गायली. एका गाण्यासाठी ते 5 ते 6 लाख रुपये घेत असे. केके लाइव्ह कॉन्सर्टमधून मोठी कमाई करत असायचे. लाइव्ह कॉन्सर्टसाठी केके जवळपास 10 ते 15 लाख रुपये घेत असे.
केके यांची एकूण संपत्ती जवळपास 62 कोटींच्या घरात
केके यांनी मृत्यूनंतर करोडोंची संपत्ती मागे सोडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, KK यांची एकूण संपत्ती सुमारे 8 मिलियन डॉलर म्हणजेच 62 कोटी इतकी होती.
गाड्यांची होती आवड
केके हे इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या गायकांपैकी एक होते. केके यांच्याकडे करोडोंच्या महागड्या गाड्याही होत्या. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये ऑडीसह अनेक मोठ्या ब्रँडच्या गाड्यांचा समावेश होता.
केके हे आलिशान घराचे मालक होते
केके लक्झरी लाइफ जगले. केके यांचा जन्म दिल्लीत झाला, पण मुंबईत त्यांचे आलिशान घर आहे, येथे ते त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.