आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन अशा निवडक महिलांपैकी एक आहे, ज्या आपल्या वक्तृत्व कौशल्याने लोकांच्या मनात एक खोल छाप सोडतात. अलीकडेच सुष्मिताचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपला मिस इंडियाचा प्रवास सांगतेय.
सुष्मिता सेनने 1994 मध्ये जेव्हा ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती. तेव्हा ती एक मध्यम वर्गीय मुलगी होती. स्पर्धेत जाण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. त्यामुळे मिस इंडिया स्पर्धेत जाताना तिने तिचे कपडे कोणत्याही डिझायनरकडून शिवून न घेता आईने आणि गॅरेजमधील एक टेलर यांनी मिळून शिवले होते. हा ड्रेस तिने स्पर्धेच्या अंतिम फेरीत परिधान केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ दिवंगत अभिनेते फारुख शेख यांच्या गाजलेल्या 'जीना इसी का नाम है'चा आहे, ज्यामध्ये सुष्मिता सेन पाहुणी म्हणून कुटुंबासोबत सहभागी झाली होती. यावेळी मिस इंडियाच्या प्रवासाबद्दल बोलताना सुष्मिता म्हणाली, “आमच्याकडे त्यावेळी एवढे पैसे नव्हते की आम्ही डिझायनर कपडे घालू शकू. आम्हाला चार डिझायनर ड्रेसची गरज होती. आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत आणि आपल्या आपल्या सीमा ठाऊक आहेत. माझी आई म्हणाली होती, काय झाले ते लोक काही तुझे कपडे बघण्यासाठी नव्हे तुला भेटायला येत आहेत'.
View this post on InstagramA post shared by Star Style Story (@starstylestory) on Apr 15, 2020 at 8:47pm PDT
पुढे सुष्मिताने सांगितले, “हे कपडे सरोजिनी नगर मार्केट मधून विकत घेतले गेले होते. आमच्या घराखाली गॅरेजमध्ये एक पेटीकोट शिवणारा टेलर होता. आम्ही त्याला सांगितले की मी टीव्हीवर येणार आहे, त्यामुळे चांगला ड्रेस शिव. मग त्या फॅब्रिकमधून माझा विनिंग गाऊन तयार केला गेला. आईने उर्वरित फॅब्रिकमधून फुले तयार केली आणि ती ड्रेसवर लावली. नवीन काळ्या रंगाचे मोजे कापून हातमोजे तयार केले गेले. तो दिवस माझ्यासाठी खूप खास आहे '.
सुष्मिताने मिस इंडिया ही स्पर्धा एका प्रश्नाच्या उत्तराने जिंकली होती. त्या स्पर्धेत सुष्मिताला एक प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुला एखादी ऐतिहासिक घटना बदलण्याची संधी मिळाली तर तु कुठली घटना निवडशील? या प्रश्नावर इंदिरा गांधी यांचा मृत्यू असे उत्तर सुष्मिताने दिले होते. या उत्तरामुळे सुष्मिता ‘मिस इंडिया’चा किताब जिंकली असे म्हटले जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.