आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'खान' आडनाव बनले संकट:उस्ताद अमजद अली खान म्हणाले- आजच्या काळात 'खान' आडनाव असणे गुन्हा आहे, त्यामुळे मुलांचे आडनाव बदलले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभर आपल्या सरोद वादनासाठी प्रसिद्ध असलेले उस्ताद अमजद अली खान यांनी नुकत्याच मुंबईत एका कार्यक्रमात असे वक्तव्य केले आहे, त्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. या कार्यक्रमात अमजद अली खान म्हणाले की, आजच्या युगात 'खान' आडनाव असणे हा गुन्हा आहे. म्हणून त्यांनी आपल्या मुलांचे आडनाव बदलले आहे.

असे वाटते की माझे नाव बदलून सरोद ठेवावे
कार्यक्रमानंतर नवभारत टाइम्स डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत अमजद खान यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. अलीकडेच अमजद खान एका मुलाखतीत म्हणाले की, त्यांच्या मुस्लिम नावामुळे त्यांना यूकेचा व्हिसा नाकारला गेला. यानंतर आपली निराशा व्यक्त करताना त्यांनी आपले नाव बदलून सरोद ठेवावे, असे वाटते, असे देखील त्यांनी मुलाखतीत सांगितले होते.

या मुद्द्यावर बोलताना अमजद अली खान म्हणाले, '21' व्या शतकात सर्वकाही शांततेत होईल, असे वाटत होते. शिक्षणाने माणसे शहाणे होतात, असे म्हटले जाते. पण शाळा हा व्यवसाय बनला आहे. कदाचित त्यामुळेच शिक्षण आपल्याला दयाळू बनवू शकले नाही. आजही धर्म आणि रंगाच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव केला जातो. जगातील लोक दयाळू होण्याऐवजी आता अधिक निर्दयी झाले आहेत.

मुंबईतील 'मॉर्निंग राग' या सरोद मैफिलीतील अमजद अली खान यांचा त्यावेळी टिपलेला फोटो
मुंबईतील 'मॉर्निंग राग' या सरोद मैफिलीतील अमजद अली खान यांचा त्यावेळी टिपलेला फोटो

'खान' आडनाव असणे हा गुन्हा आहे, त्यामुळे मुलांचे आडनाव बदलले
जगभरातील मुस्लिमांना भेडसावणाऱ्या भेदभावावर अमजद खान म्हणाले की, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 9/11 च्या हल्ल्यानंतर मुस्लिमांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. तो म्हणाला, '9/11 नंतर लोक मिस्टर खान म्हणून परदेशात गेल्यावर तपासायचे. आजच्या काळात 'खान' आडनाव असणं हा गुन्हा आहे. म्हणून जेव्हा माझी मुले अमान आणि अयान यांचा जन्म झाला, तेव्हा माझ्या पत्नीने आमच्या पूर्वजांचे खान आडनावावरून बदलून बंगश केले. आता जगभरातून कोणतीही खान व्यक्ती अमेरिकेत किंवा इतर कोठेही गेली, तर त्यांची अधिक तपासणी केली जाते. आमच्या बाबतीत असे फारसे काही घडले नसले तरी तेथील लोकांच्या मन:शांतीसाठी आम्ही सूटबूट घालतो.

भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमधील वाढत्या अंतरावर अमजद खान म्हणाले की, "आम्ही वेगवेगळ्या पक्षांशी आणि त्यांच्या विचारसरणीशी संबंधित आहोत. कदाचित आपल्या शिक्षणपद्धतीत काही उणिवा असतील, त्या सुधाराव्यात. ही सिस्टीम बरोबर असेल तर पीएचडी केलेला माणूस जातीयवादी कसा होऊ शकतो, मग तो धर्म कोणताही असो. म्हणूनच आपण लोकांना दयाळू बनवले पाहिजे. पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर आधी आपला एकच देश होता, पण फाळणी झाली. भारत आणि पाकिस्तान हे वेगळे झाले. जर हे दोन्ही देश एकमेकांना मदत करत नसतील. तर एकमेकांच्या वाईटाचा विचार तरी करु नका. संगीताला कोणताही धर्म नसतो आणि व तोच आपल्याला एकत्र आणू शकतो.

अमजद खान यांच्या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी आणि चित्रपट निर्माते गुलजार यांची होती उपस्थिती
अमजद खान यांच्या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी आणि चित्रपट निर्माते गुलजार यांची होती उपस्थिती

केवळ धर्माच्या आधारे केले जाते राजकारण
भारतासह जगात धर्माच्या आधारावर वाढत्या असहिष्णुतेवर अमजद खान म्हणाले, 'सर्वत्र केवळ धर्माच्या आधारे राजकारण केले जात आहे. हे फक्त भारतापुरतेच नाही. माझे वडील म्हणाले की संपूर्ण जगाचा एकच परमेश्वर आहे. मानवता हा एकच धर्म आहे. मला प्रत्येक धर्माशी जोडलेले वाटते. माझा संपुर्ण प्रेक्षक सर्व धर्माचे आहेत. म्हणूनच मी संपूर्ण जगाच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे याचे मला खूप दुःख आहे. त्यामुळे महागाई खूप वाढली आहे. आणि सरकार कोणाचेही असो, पण एकदा दर वाढले की ते कधीच खाली येत नाहीत.

अमजद खान यांनी 'मॉर्निंग रागा'चे केले आयोजन
अमजद अली खान यांनी मुंबईतील प्रसिद्ध रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये 'मॉर्निंग रागा' या विशेष सरोद कॉन्सर्टचे आयोजन केले होते. अमजद यांच्या या कार्यक्रमात त्यांच्या चाहत्यांसह प्रसिद्ध कवी आणि चित्रपट निर्माते गुलजारही उपस्थित होते. गुलजार यांनी अमजद यांच्यासाठी एक डॉक्युमेंट्री फिल्मही बनवली आहे, त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...