आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर एक्सक्लूझिव्ह:राजू श्रीवास्तव म्हणाले- यूपी फिल्मसिटी प्रोजेक्ट 5000 कोटींचा आहे, आमचा हेतू मुंबई फिल्मसिटीला नुकसान पोहोचवणे हा नाही

अमित कर्ण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉमेडियन राजू श्रीवास्तव उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. - Divya Marathi
कॉमेडियन राजू श्रीवास्तव उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत.
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौर्‍यावर
  • योगींनी अक्षय कुमार, जॉन अब्राहमसह अनेक दिग्गजांशी केली चर्चा

उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी तयार करण्याचा मुद्दा यूपी आणि महाराष्ट्र सरकारमधील वादाचे कारण बनले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे चेअरमन आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी यूपीत फिल्म सिटी प्रोजेक्ट उभारण्याविषयी भास्करसोबत बातचीत केली.

5000 कोटींचा आहे फिल्मसिटी प्रकल्प

दैनिक भास्करशी बोलताना राजू श्रीवास्तव म्हणाले, "फिल्मसिटीचा प्रकल्प 5000 कोटी रुपयांचा आहे. आता ही वेळ येत आहे की, ज्याला सर्वात चांगल्या सुविधांनी सज्ज केले जाईल त्याला निर्मात्यांची पसंती मिळेल. ते मार्केटमध्ये टिकेल. आता निर्मात्यांकडे पर्याय असेल. फिल्मसिटी देखील भागीदारीत तयार केली जाईल. सरकार जमीन देईल", अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबई फिल्मसिटीला नुकसान पोहोचवण्याचा हेतू नाही

राजू श्रीवास्तव म्हणतात, "आमचा हेतू मुंबईच्या चित्रपटसृष्टीला हानी पोहचविणे हा अजिबात नाही. ते शक्यही नाही."

प्रत्येक राज्याला रोजगार निर्मितीचा अधिकार आहे
राजू श्रीवास्तव पुढे म्हणाले, "रोजगार आणि पर्यटनाला प्रोत्साहन आणि चालना देण्याचा प्रत्येक राज्याचा अधिकार आहे. यूपीमध्ये फिल्मसिटीची निर्मिती याच उद्देशाने होते आहे. आमचे उद्दिष्ट हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीपेक्षा एक चांगले ठिकाण निर्माण करणे आहे. जेणेकरून चित्रपट निर्मात्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतील."

राजूंच्या म्हणण्यानुसार, चित्रपट निर्माते काय म्हणाले?
राजू श्रीवास्तव सांगतात, "लखनऊमध्ये जॉन अब्राहम आणि भूषण कुमार यांनी प्रथम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. मंगळवारी रात्री अक्षय कुमार यांनीही योगी जी यांना आपले व्हिजन सांगितले. बुधवारी बोनी कपूर, सुभाष घई, अनिल शर्मा यांनीही सांगितले की यूपीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटसृष्टी निर्माण झाली तर चित्रपट निर्माते तेथे शूटिंगसाठी जातील."

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser