आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘उतरन’ या गाजलेल्या टीव्ही मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता नंदिश संधूच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नंदिशचा धाकटा भाऊ ओंकार सिंहचे निधन झाले आहे. नंदिशने स्वतः लहान भाऊ ओंकार सिंह संधूच्या निधनाची बातमी पोस्ट करून दिली आहे. नंदिशचा धाकटा भाऊ कर्करोगाशी झुंज देत होता. ओंकारने 28 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत नंदिशच्या भावावर अंतिम संस्कार झाले.
नंदिशने लिहिली इमोशन नोट
नंदिशने आपल्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी ही दुःखद बातमी शेअर केली. धाकटा भाऊ ओंकार आता या जगात नसल्याचे नंदिशने त्याचे फोटो पोस्ट करत सांगितले. ओंकारचा एक फोटो शेअर करत नंदिशने लिहिले, "अशा रितीने तू कायम आमच्या आठवणीत राहशील. नेहमी हसतमुख, आनंद पसरवणारा, आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असणारा तू खरा लढवय्या आहेस. छोट्या, पुन्हा कधीतरी भेटूया जगाच्या पलीकडे, तू आम्हा सर्वांना लढायला शिकवले, शेवटपर्यंत तेही हसतमुखाने. मी तुला माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस साजरा करण्याचे वचन देतो. R.I.P. ओंकार सिंह संधू," अशा शब्दांत नंदिशने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
कलाकारांनी केले सांत्वन
नंदिशच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच इंडस्ट्रीतील त्याचे मित्रही कमेंट करून ओंकारला श्रद्धांजली वाहत आहेत. कॉमेडियन भारती सिंगने ओंकारच्या निधनावर शोक व्यक्त केला. तसेच अंकिता लोखंडने लिहिले, 'ओंकारच्या आत्म्यास शांती लाभो. या कठीण प्रसंगाशी सामना करण्यासाठी तुला शक्ती मिळो नंदिश.' अभिनेत्री आकांशा पुरीने लिहिले, 'खूप मोठे नुकसान, ओंकारच्या निधनाची बातमी कळल्यानंतर दुःख झाले. या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती तुला मिळो.'
यासह शरद मल्होत्रा, कृतिका कामरा, अर्जुन बिजलानीसह अनेकांनी ओंकारला श्रद्धांजली वाहिली आहे. नंदिश संधू सध्या 'जुबली' या वेब सिरीजमधून बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.