आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा खुलासा:म्हणाले - सलमान खान कायमच मला कौटुंबिक चित्रपट बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर आणि डॅनी डेन्जोंगपा स्टारर 'ऊंचाई' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून दिग्दर्शक सुरज बडजात्या हे बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शक म्हणून समोर येणार आहेत. सुरज बडजात्या आणि सलमान खान असे एक वेगळे समीकरण आहे. ‘मैंने प्यार किया’ चित्रपटापासून त्यांची जोडी प्रसिद्ध आहे. सुरज बडजात्या आणि सलमान खान यांनी शेवटचे ‘प्रेम रतन धनो पायो’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्याआधी ‘हम आपके है कौ’न, ‘हम साथ साथ हैं’ यांसारख्या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. बडजात्या यांचे चित्रपट कौटुंबिक पार्श्वभूमीचे असतात. विशेष म्हणजे कौटुंबिक चित्रपट बनवण्यासाठी सलमान खानच नेहमी आपल्याला प्रोत्साहित करतो, अशी प्रांजळ कबुली सूरज बडजात्या यांनी नुकत्याच एका मुलाखतीत दिली आहे.

सलमान मला प्रोत्साहन देतो

वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सूरज बडजात्या म्हणाले, ‘सलमान मला म्हणतो की मी अॅक्शन चित्रपट सगळीकडे करत असतो, पण आपण कौटुंबिक चित्रपट करु. तो कायमच मला कौटुंबिक धाटणीचे चित्रपट बनवण्यासाठी प्रेरित करत असतो. बहीण, भाऊ, कुटुंब... कौटुंबिक मुल्य असलेले चित्रपट इतर कुणी करत नाहीत... त्यामुळे आपण असेच चित्रपट करु असे तो मला कायम म्हणत असतो. कुटुंब हे त्याच्या आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. शिवाय, आम्हा दोघांना एकत्र जास्त वेळ घालवायला आवडतो,” असे बडजात्या यांनी सांगितले.

'ऊंचाई'मध्ये सलमानला करायचे होते काम

'ऊंचाई' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी, बडजात्या यांनी खुलासा केला होता की, सलमानला या चित्रपटात काम करायचे होते. ते म्हणाले, "जेव्हा मी हा चित्रपट बनवत होतो, तेव्हा सलमानने मला विचारले, ‘सूरज तू काय बनवत आहेस?’, ‘तू हिल्सवर का जात आहेस?’ मग तो मला म्हणाला, ‘मी हा चित्रपट करू शकतो का?’ मी त्याला नाही म्हणालो. कारण आपल्या सर्वांना माहित आहे की तो पर्वत चढू शकतो. पण मला अशा लोकांची गरज होती जे फक्त तो पाहू शकतात, तो सर करणे त्यांच्यासाठी सोपे नसते," असे बडजात्या म्हणाले.

लवकरच सलमानसोबत करणार आहेत चित्रपट

सूरज आणि सलमान लवकरच आणखी एका प्रोजेक्टवर एकत्र येणार आहेत, जो एक कौटुंबिक ड्रामा असेल. त्यांचा मुलगा अवनीश बडजात्याच्या लवकरच एक चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. ज्यात सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर आणि अभिनेत्री पूनम ढिल्लनची मुलगी पलोमाला तो लॉन्च करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सूरज बडजात्या करणार आहेत. त्यानंतर ते एका सिरीजवर काम करतील आणि नंतर ते सलमानसोबत नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करतील.

11 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय 'ऊंचाई'

'ऊंचाई' या चित्रपटाबद्दल सांगायचे तर या चित्रपटात अमिताभ, अनुपम, बोमन आणि डॅनी यांच्याव्यतिरिक्त नीना गुप्ता, सारिका, परिणीती चोप्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 11 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा वयाची 60 वर्षे पार केलेल्या 4 मित्रांच्या भोवती फिरते. या चारपैकी एका मित्राचे निधन होते, आणि केवळ त्या मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी उरलेले तिघे मित्र हे माऊंट एव्हरेस्ट शिखर चढायचे ठरवतात. येत्या 11 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...