आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जया बच्चन यांनी कंगना रनोटकडे केले सपशेल दुर्लक्ष:'ऊंचाई'च्या स्क्रीनिंगवेळी कंगनाकडे पाहून फिरवली पाठ

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या आगामी 'ऊंचाई' या चित्रपटाचे बुधवारी रात्री स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. कंगना रनोट, अभिषेक बच्चन, सलमान खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आता या स्क्रीनिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये जया बच्चन कंगना रनोट हिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

कंगनाला पाहून जया यांनी पाठ फिरवली
स्क्रीनिंगला जया बच्चन आधी पोहोचल्या तर कंगनाही त्यांच्या पाठोपाठ पोहोचली. पापाराझी कंगना-कंगना ओरडत असताना, जया कंगनाकडे दुर्लक्ष करून भाग्यश्रीला मिठी मारताना दिसल्या. त्यानंतर कंगनाने जया यांना नमस्कार केला असता कोणतीही प्रतिक्रिया न देता जया पुढे निघून गेल्या. व्हिडिओमध्ये अनुपम खेर जया यांना कंगनाला भेटायला सांगतात, पण तरीही जया कंगनाकडे लक्ष देत नाहीत.

चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ समोर येताच चाहते कंगनाची बाजू घेत जया यांना ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'कंगनाला कोणाचीही गरज नाही.' तर दुसऱ्याने लिहिले की, 'जया बच्चन एक रुड महिला आहेत.' अशा विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

अभिषेकसोबत गप्पा मारताना दिसली कंगना
या स्क्रीनिंगचा आणखी एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये अभिषेक बच्चन कंगनाला मिठी मारताना आणि तिच्याशी गप्पा मारताना दिसतोय.

'ऊंचाई' 11 नोव्हेंबरला होणार आहे प्रदर्शित
कंगना आणि जयाशिवाय इतर अनेक कलाकारांनीही या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. राणी मुखर्जी, काजोल, सलमान खान, रितेश देशमुख आणि शहनाज गिल सारखे सेलिब्रिटी यावेली हजर होते. 'ऊंचाई' या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्याशिवाय परिणीती चोप्रा, अनुपम खेर, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंगपा आणि सारिका यांच्या मुख्य भूमिका आहेत. सूरज बडजात्या दिग्दर्शित हा चित्रपट चार मित्रांमधील कथा आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...