आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी 'शमशेरा' चित्रपटातील रणबीर कपूरच्या लूकनंतर आता संजय दत्त आणि वाणी कपूरचा लूकही समोर आला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला, ज्यामध्ये वाणी दिसली नव्हती, पण आता चित्रपटातील तिचा पहिला लूक प्रेक्षकांना बघायला मिळाला आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात संजय खलनायकाची भूमिका साकारत आहे.
वाणी सोनेरी छटेत दिसतेय
वाणी कपूरने तिच्या लूकचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, "ती जिद्दी आहे आणि तिचे हृदय सोन्याचे आहे. ती सोना आहे! शमशेराचा ट्रेलर उद्या येतोय," असे कॅप्शन वाणीने दिले आहे.
'शमशेरा'मधील आपला फर्स्ट लूक शेअर करताना संजयने लिहिले, "दरोगा शुद्ध सिंहला भेटा. त्याला उद्या 'शमशेरा'च्या ट्रेलरमध्ये पहा." यामध्ये संजयचा लूक खूपच भयानक दिसत आहे.
'शमशेरा' तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे
संजय दत्त 'अग्निपथ'नंतर करण मल्होत्रासोबत 'शमशेरा'मध्ये दुसऱ्यांदा काम करत आहे. चित्रपटाची कथा एका गुलाम माणसाची आहे. आपल्या टोळीसाठी गुलामापासून नेता आणि नंतर लिजेंड बनण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट 22 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.