आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजराती लोकगायिकेचा मृतदेह कारमध्ये आढळला:वैशाली बलसाराची गळा आवळून हत्या, पोलिसांचा तपास सुरू

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील प्रसिद्ध लोकगायिका वैशाली बलसारा हिचा मृतदेह कारमध्ये सापडल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवालात तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैशाली शनिवारी घरातून बाहेर पडली होती. तिला उशीर झाल्याने वैशालीचा पती हरेश याने मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा फोन बंद होता.

यानंतर दुपारी दोनच्या सुमारास हरेश बलसाराने वलसाड शहर पोलिसांत वैशाली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला आणि दुसर्‍याच दिवशी म्हणजे रविवारी वलसाडच्या पारडी येथे नदीच्या काठावर एका कारमधून वैशालीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला.

या गाडीतून वैशालीचा मृतदेह पोलिसांनी जप्त केला आहे.
या गाडीतून वैशालीचा मृतदेह पोलिसांनी जप्त केला आहे.

हत्येमागच्या कारणाचा अद्याप पोलिसांना सुगावा लागलेला नाही
वैशालीच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 8 पथके तयार केली असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिस खून, पैशांचा व्यवहार, अंतर्गत कलह, अवैध संबंध अशा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मात्र हत्येमागील कारणाचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. 31 डिसेंबर 2021 रोजी नवीन वर्षाच्या पार्टीत पोलिसांनी वैशालीच्या घरी छापा टाकला आणि तिला मद्यधुंद अवस्थेत मित्रांसह पकडले होते.

वैशाली हरेशची दुसरी पत्नी होती
वैशालीचे लग्न 2011 मध्ये हरेशसोबत झाले होते. दोघांनाही एक मुलगी आहे. हरेश बलसाराला त्याच्या पहिल्या पत्नीपासूनदेखील एक मुलगी आहे. हरेश आणि वैशाली त्यांच्या दोन मुली आणि आई-वडिलांसोबत राहत होते. वैशाली पतीसोबत गुजरात आणि आसपासच्या शहरात शो करत असे.

बातम्या आणखी आहेत...