आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅलेंटाइन डे स्पेशल:'ओमकारा'च्या सेटवर झालेली ओळख 'टशन' च्या शुटिंगदरम्यान प्रेमात बदलली आणि 10 वर्षांनी मोठा असलेल्या सैफची झाली करीना

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॅलेंटाइन दिवस जवळ आला आहे. अशात आज आपण बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोड्यांपैकी एक असलेली सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या लव्ह स्टोरीविषयी जाणून घेऊयात. अनेक वर्षांची ओळख असूनही, यांना लग्नासाठी बराच वेळ लागला. एकीकडे करीनाचा बॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली कपूर घराण्यात जन्म झाला, तर सैफ रॉयल कुटुंबाचा नवाब मंसून अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा होता. वेगवेगळ्या धर्मातले असल्यामुळे देखील या दोघांच्या लग्नाची नेहमीच चर्चेत राहिली.

शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सैफच्या जवळ आली करीना

2007 दरम्यान शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीना कपूररची सैफ अली खानसोबतची जवळीक वाढू लागली होती. 'ओमकारा' चित्रपटात सैफ आणि करीनाचे फारच कमी सीन्स शूट करायचे होते. सेटवर दोघेही एकत्र दिसायचे. सैफ आणि करीनाचे सीन सोबत नसताना देखील दोघे एकत्र असायचे. 'ओमकारा' चित्रपटानंतर सैफ आणि करीनाची जवळीक यशराज बॅनरचा चित्रपट 'टशन'च्या चित्रिकरणादरम्यान दिसली.

शूटिंग दरम्यान लाँग वॉकला जायचे

शूटिंगमधून वेळ काढून दोघेही लॉन्ग वॉकवर जायचे. या दोघांच्या अफेयर्सची गॉसिप सुरू झाली होती, पण माध्यमांसमोर या दोघांनीही ते मान्य केले नाही. लॅक्मे फॅशन वीकमध्ये सैफ-करीना पहिल्यांदा एकाच गाडीतून एकत्र आले होते. येथे पहिल्यांदाच आपण करीनाला डेट करत असल्याचे सैफने मान्य केले. 2010 मध्ये सैफ आण करीना लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र याचेही खंडन करण्यात आले.

2012 मध्ये केले लग्न

करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न झाले. सैफची पहिली पत्नी अमृता सिंह होती, 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. करीना सैफपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. लग्नानंतर 2016 मध्ये करीना मुलगा तैमूरची आई झाली. ती लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे.

लव्ह जिहादबद्दलही झाली होती चर्चा

काही संघटनांनी सैफ-करीनाच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हटले होते. यावर करीनाने म्हटले होते की, माझा प्रेमावर विश्वास आहे, लव्ह जिहादवर नाही. मला वाटते की प्रेम एक अशी गोष्ट आहे जी आपण परिभाषित करू शकत नाही. प्रेमामध्ये धर्माची कोणतीही भिंत नसते. जर एक हिंदू मुलगा मुस्लिम मुलीवर प्रेम करत असेल तर तुम्ही त्याला रोखू शकत नाहीत. आपण कोणाला विचारून प्रेम करू शकत नाही.