आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅलेंटाइन डे स्पेशल:'मुगल-ए-आजम'पासून 'वीर जारा' पर्यंत, बॉलिवूडच्या या ब्लॉकबस्टर लव्ह स्टोरीजनी लोकांना प्रेम करायला शिकवले

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडने आतापर्यंत अनेक सुंदर लव्ह स्टोरीज दाखवल्या आहेत, ज्या नेहमी एव्हरग्रीन राहिल्या. व्हॅलेंटाइन डेच्या विशेष प्रसंगी सर्वोत्कृष्ट प्रेमकथा दर्शवणारे चित्रपट कोणते आहेत ते पाहुया...

मुगल-ए- आजम

1960 मध्ये प्रदर्शित झालेला मुगल-ए-आजम एक संगीतमय रोमान्स चित्रपट आहे. या चित्रपटात अनारकली आणि शहजादे सलीमची सुंदर, अवघड आणि अपूर्ण प्रेमकथा दाखविली आहे. हा ऐतिहासित चित्रपट बनण्यास 14 वर्षे लागली होती, जो ब्लॅक अँड व्हाइट प्रदर्शित केला होता. नंतर रंगित चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला होता. हा त्याकाळातला सर्वात महागडा चित्रपट होता. 1.5 कोटी बजेटच्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर 11 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. मुघल साम्राज्याचा शहजादा सलीमला महालात नाचणाऱ्या अनारकलीवर प्रेम होते. सलीमचे वडील अकबरला दोघांचे नाते मान्य नसते. प्रेमाविरुद्ध अकबर आपल्याच मुलाविरोधात युद्धाची घोषणा करतो.

मसान

मल्टिस्टारर फिल्म मसानमध्ये बर्‍याच कथा दाखवल्या गेल्या आहेत. या चित्रपटात विकी कौशल आणि श्वेता त्रिपाठीची अपूर्ण प्रेमकहाणी देखील दाखवली आहे. विक्की ऊर्फ दीपक चौधरी घाटावर प्रेत जाळण्याचे काम करत असतो, तर श्वेता ऊर्फ शालू गुप्ता एका चांगल्या कुटुंबातून असते. दोघांची परिस्थिती वेगळी असूनही दोघे एकमेकांचा स्वीकार करतात. पण दुर्दैवाने एका रस्ते अपघातानंतर दीपककडे त्याची प्रेयसी शालूचे प्रेत जाळण्यासाठी येते. यासोबत रिचा चड्डा ऊर्फ देवी पाठक हिची कथा देखील दाखवली आहे. जी एका हॉटेलमध्ये आपल्या प्रियकरासोबत फिजिकल होत असताना पोलिसांकडून पकडली जाते. लाजेपोटी देवीचा प्रियकर त्याच हॉटेलमध्ये आत्महत्या करतो. त्यानंतर देवी आपले संपूर्ण आयुष्य पश्चातापात जगते.

बर्फी

2012 मध्ये आलेला बर्फी एक गोंडस प्रेमकहाणी आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवले की, बर्फीला एक सुंदर मुलगी श्रुतीवर (इलियाना डिक्रुज) प्रेम होते. श्रुतीच्या आईला मुकबधिर बर्फी आणि श्रुतीचे नात्याला नकार देते आणि तिचे दुसऱ्यासोबत लग्न लावते. वडिलांच्या उपचारासाठी बर्फी बँक लुटतो. त्या दरम्यान चुकीने त्याच्याकडून झिलमिल चॅटर्जीचे अपहरण होते, जी बर्फीसारखी सामान्य नसते. पैसे मिळाल्यानंतर जेव्हा बर्फी झिलमिलला गावाकडे सोडतो तेव्हा ती जाण्यास नकार देते. नंतर बर्फी पोलिसांपासून लपत झिलमिलसोबत कोलकाताला जातो, जिथे त्याचे पहिले प्रेम श्रुतीसोबत पुन्हा भेट होते. श्रुतीशी स्वतःची तुलना करताना झिलमिल अचानक गायब होते, त्यानंतर बर्फीला समजते की, झिलमिलच त्याचे खरे प्रेम आहे. बऱ्याच संघर्षानंतर बर्फील झिलमिलला शोध घेतो आणि तिच्यासोबत संपूर्ण आयुष्य जगतो आणि शेवटी दोघेही सोबतच प्राण सोडतात.

टू स्टेट

बॉलिवूड चित्रपट टू स्टेट आंतरजातीय विवाहावर आधारित आहे. या चित्रपटात पंजाबी कुटुंबातून असलेला कृश आणि दक्षिण भारतीय अन्नया यांची प्रेमकथा दाखविली आहे. जेव्हा कॉलेजमधील प्रेमाचे विवाहामध्ये रूपांतर करण्याची वेळ येते, तेव्हा या दोघांनाही कुटुंबाच्या कठोर प्रश्नांचा आणि वृत्तीचा सामना करावा लागतो. लग्नासाठी कुटुंबांचा विरोध असताना देखील दोघे कशाप्रकारे त्यांना या लग्नासाठी तयार करतात यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. चित्रपटात अर्जुन कपूर, आलिया भट, अमृता सिंग आणि रोनित रॉय मुख्य भूमिकेत आहेत.

रॉकस्टार

इम्तियाज अली दिग्दर्शितक रॉकस्टार एक सुंदर लव्ह स्टोरी आहे. परंतु अनेक चित्रपटांप्रमाणे रॉकस्टार हॅप्पी एंडिंगवर संपत नाही. चित्रपट जनार्दन नावाच्या एका सरळ कथा आहे. जनार्दनला (रणबीर कपूर) रॉकस्टार व्हायची इच्छा असते. एक हॉटेल चालक त्याला सल्ला देतो की, प्रेमभंग झालेले लोक चांगले रॉकस्टार बनतात. हे ऐकून प्रेमभंग करण्यासाठी जनार्दन कॉलेजमधील सर्वात प्रसिद्ध मुलगी हीरकडे (नरगिस फाकरी) जातो. या नाट्यादरम्यान जनार्दन हीरच्या प्रेमात पडतो. पण तिचे दुसरीकडे लग्न होत असते. परत आल्यानंतर जनार्दन एक लोकप्रिय गायक बनतो. परागमध्ये दोघे पुन्हा जवळ येतात, मात्र हीरचे वैवाहिक आयुष्य त्यांना अडवते. जेव्हा जनार्दनला हीरच्या आजाराविषयी समजते, तेव्हा दोघे शेवटचे काही क्षण सोबत घालवतात. यादरम्यान हीर गर्भवती होते आणि त्यामुळे ती कोमात जाते आणि तिचा मृत्यू होतो. हीरचे कुटुंब जनार्दनला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवते.

वीर जारा

2004 चा वीर-जारा चित्रपट दोन शत्रु देशांच्या लोकांची लव्ह स्टोरी आहे. एका दुर्घटनेदरम्यान भारतीय पायलट वीर आणि पाकिस्तानी जारा यांची भेट होते. जारा आपल्या आजीच्या अस्थी विर्सजित करण्यासाठी एकटी भारतात येते, जिथे तिच्या बसचा अपघात होतो. जाराला वाचवून वीर तिला आपल्या गावी घेऊन जातो. सुंदर प्रवासादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. जेव्हा वीर तिला सोडण्यासाठी स्टेशनवर जातो तेव्हा त्याची जाराचा होणारा नवरा रजा शाजी याच्याशी भेट होते. लग्नाआधी वीर जाराला पाकिस्तानात घेऊन जातो, जेथे त्याला भारतीय हेर समजून जबरदस्तीने तुरूंगात पाठवतात. दोघांची लव्ह स्टोरी येथे संपते. मात्र अनेक वर्षांनंतर दोघांनी पुन्हा भेट होते. वीरचा खटला लढणारी वकील सामिया दोघांची पुन्हा भेट घडवून आणते, तेव्हा समजते की, जारा अनेक वर्षांपासून वीरला मृत समजून एकटीच आयुष्य जगत होती.