आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेपरेशन:पती रितेशपासून विभक्त झाली राखी सावंत, म्हणाली - व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी हे सर्व घडले याचे मला खूप वाईट वाटत आहे

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाली राखी सावंत...

राखी सावंतने पती रितेशपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. ही माहिती तिने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. बिग बॉसनंतर या कपलच्या नात्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या, ज्या सुधारण्यासाठी दोघांनी प्रयत्न केले. मात्र जेव्हा सर्व काही ठीक झाले नाही तेव्हा दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

मी आणि रितेश वेगळे झालो आहोत: राखी
राखीने पोस्ट शेअर करत सांगितले, 'डिअर फॅन्स, मला तुम्हाला सांगायचे आहे की रितेश आणि मी एकमेकांपासून वेगळे झालो आहोत. 'बिग बॉस' नंतर बरेच काही घडले आणि अनेक गोष्टी घडल्या ज्या माझ्या नियंत्रणाबाहेर होत्या. आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केले पण शेवटी ठरवलं की आता दोघांनी आपलं आयुष्य वेगळं घालवायचं.'

राखीने पुढे लिहिले, 'व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी हे सर्व घडले याचे मला खूप वाईट वाटत आहे. पण निर्णय घ्यायचा होता. आशा आहे की रितेशसोबत सर्व काही ठीक होईल. मला यावेळी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे, स्वतःला आनंदी आणि निरोगी ठेवायचे आहे. मला समजून घेतल्याबद्दल आणि सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचे आभार. राखी सावंत.'

बातम्या आणखी आहेत...