आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थला अजितचे स्टारडम:'वलीमाई'ने पहिल्याच दिवशी केली 62 कोटींची कमाई; एकट्या तामिळनाडूत 36 कोटींचे ओपनिंग, 'पुष्पा'ला पछाडले

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अल्लू अर्जुनला मागे टाकले

तेलुगू सुपरस्टार अजित आणि हुमा कुरेशी स्टारर 'वलीमाई' या चित्रपटाला कोरोना काळात सर्वात मोठी ओपनिंग मिळाली आहे. या चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन 62.36 कोटी आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, त्याचा थेट फायदा चित्रपटाच्या ओपनिंग कलेक्शनला झाला आहे.

अजितच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तामिळनाडूमध्ये त्याचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 36 कोटी आहे. त्याचवेळी चेन्नईमध्ये 1.84 कोटींची ओपनिंग मिळाली आहे. चेन्नईमध्ये एवढी मोठी ओपनिंग मिळालेला अजितचा हा पहिलाच चित्रपट आहे.

अल्लू अर्जुनला मागे टाकले
कोविड काळात प्रदर्शित झालेल्या साऊथच्या चित्रपटांचे ओपनिंग कलेक्शन चांगले आहे. गेल्या वर्षी 13 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या 'मास्टर' चित्रपटाने पहिल्याच दिवशी 42 कोटींची कमाई केली होती. 4 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या 'अन्नाथे' या चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन तामिळनाडूतच 34.92 कोटी होते. मोहनलालच्या 'मरक्कर: लॉयन ऑफ द अरेबियन सी'ने पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली. दुसरीकडे, अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज स्टार' 52.50 कोटींची ओपनिंग करून वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरला होता.

चाहत्यांनी अजितच्या पोस्टरला दुधाने अभिषेक घातला
या चित्रपटाबद्दल आणि अजित कुमारबद्दल चाहत्यांची क्रेझ इतकी आहे की दक्षिणेतील अनेक शहरांमध्ये सिनेमा हॉलबाहेर रस्ते जाम झाले. त्यामुळे अनेक मार्ग वळवावे लागले.
अनेक व्हिडिओंमध्ये चाहते अजित कुमारच्या मोठ्या पोस्टरला दुधाने अभिषेक घालताना दिसत आहेत. हुमा कुरेशीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये ती थिएटरबाहेर चाहत्यांची गर्दी पाहून आश्चर्यचकित आणि आनंदी दिसत आहे.

रिलीजपूर्वीच या चित्रपटाने विक्रमी 155 कोटींची कमाई केली
रिपोर्ट्सनुसार, अजित कुमारच्या 'वलीमाई' या चित्रपटाचे थिएटर हक्क जागतिक स्तरावर एकूण 96 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाने रिलीजपूर्वीच जागतिक स्तरावर 96 कोटींचा व्यवसाय केला आहे. या आकडेवारीसह, अजित कुमारच्या 'वलीमाई'ने त्याच्या 2017 मध्ये आलेल्या 'विवेगम' चित्रपटाचा विक्रम मोडला, त्याचे 85 कोटी रुपयांना थिएटरचे हक्क विकले गेले होते.

वृत्तानुसार, अजित कुमारच्या वलिमाई या चित्रपटाने थिएटरच्या हक्कांव्यतिरिक्त सॅटेलाइट, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि संगीताद्वारे सुमारे 60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या अर्थाने अजित कुमारच्या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 155 कोटींचा व्यवसाय केला आहे.

एच विनोथ दिग्दर्शित, या चित्रपटात अजित कुमार-हुमा कुरेशीसह कार्तिकेय, योगी बाबू, सुमित्रा आणि पुगाज यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अजितने या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...