आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआलिया भट्ट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 10.5 आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 13.32 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच आलियाच्या चित्रपटाने दोन दिवसांत एकुण 23.82 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाचा रविवारचा कमाईचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र चित्रपटाने कमाईत 35 टक्क्यांची झेप घेतली असा अंदाज ट्रेड अॅनालिस्ट गिरीश जोहर यांनी वर्तवला आहे. हा चित्रपट 50% ऑक्युपेसीसह प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
दुसरीकडे, साऊथ सुपरस्टार अजितचा 'वलीमाई' रिलीजच्या तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. याने आतापर्यंत तामिळनाडूमध्ये 81.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच 'भीमला नायक'ने दुसऱ्या दिवशी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश सर्कलमधून 62 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
अजितची आहे दक्षिणेत क्रेझ
'वलीमाई' या चित्रपटाबद्दल आणि अजित कुमारबद्दल चाहत्यांची क्रेझ इतकी आहे की, दक्षिणेतील अनेक शहरांमध्ये चित्रपटगृहांबाहेर रस्ते जाम झाले. त्यामुळे अनेक मार्ग वळवावे लागले. अनेक व्हिडिओंमध्ये चाहते अजित कुमारच्या मोठ्या पोस्टरला दुधाने अभिषेक घालताना दिसले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.