आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाऊथ सुपरस्टार अजितचा 'वलीमाई' हा चित्रपट 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 62.36 कोटींची कमाई करून अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाने तामिळनाडूमध्ये 32 कोटींचा गल्ला जमवून राज्यात सर्वाधिक कलेक्शन करण्याचा विक्रम केला आहे. कोरोना काळापासून दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील चित्रपट सातत्याने उत्कृष्ट ओपनिंग आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन करून विक्रम प्रस्थापित करत आहेत. दुसरीकडे, फक्त 'सूर्यवंशी' हा बॉलिवूडचा एकमेव चित्रपट आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर साऊथच्या चित्रपटांना टक्कर दिली आहे.
चला जाणून घेऊया, गेल्या 3 वर्षात कोरोनाच्या काळात कोणत्या दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांनी सर्वोत्तम ओपनिंग मिळवली -
अन्नाथे
थलायवा रजनीकांत आणि कीर्ती सुरेश स्टारर चित्रपट 'अन्नाथे' ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. पहिल्या दिवशी चित्रपटाने 70 कोटी रुपयांचे ओपनिंग कलेक्शन मिळवले होते. अवघ्या एका आठवड्यात हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. 4 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट रजनीकांत यांच्या करिअरचा 9 वा चित्रपट होता, ज्याने 100 कोटींहून अधिक कलेक्शन केले. हा कोरोना काळातील सर्वाधिक कलेक्शन आणि ओपनिंग करणारा चित्रपट आहे.
मास्टर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रिलीज झालेल्या साऊथ सुपरस्टार विजयच्या 'मास्टर' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 42 कोटींचा गल्ला जमवला होता. चित्रपटगृहे उघडल्यानंतर प्रदर्शित झालेला हा पहिला हिट चित्रपट होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चित्रपटाचे हे ओपनिंग कलेक्शन केवळ 50 टक्के क्षमेतेने चित्रपटगृहे सुरु असताना केले होते. या चित्रपटाने परदेशात 230 कोटींची कमाई केली आहे.
पुष्पा
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर फिल्म 'पुष्पा: द राइज'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतात 44 कोटींची कमाई केली होती, तर जगभरात 51 कोटी कमावले होते. या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत 100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले होते. या चित्रपटाच्या हिंदी रिलीजने पहिल्या आठवड्यात 26 कोटींचा बिझनेस केला होता. हा चित्रपट आणि त्यातील गाणी इतकी हिट झाली की त्याचे स्टेप्स ट्रेंडमध्ये होते.
सूर्यवंशी
चित्रपटगृहे उघडल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. अनेक महिने पुढे ढकलल्यानंतर हा चित्रपट अखेर 5 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला. या चित्ररटाने 26.29 कोटी रुपयांचे ओपनिंग कलेक्शन केले. या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते, तर अजय देवगण आणि रणवीर सिंग देखील चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकले होते.
वकील साब 9 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या पवन कल्याणच्या 'वकील साब' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 42 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने जगभरात 137 कोटींची कमाई केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.