आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध पार्श्वगायिका वाणी जयराम काळाच्या पडद्याआड:वयाच्या 78व्या वर्षी निधन, करिअरमध्ये गायली 10 हजारांहून अधिक गाणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगीत क्षेत्रातून एक दुःखद बातमी आहे. दक्षिण भारतातील ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या चेन्नईतील हैडोस रोड, नुंगमबक्कम येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कोण होत्या वाणी जयराम?
वाणी जयराम दक्षिणेतील प्रसिद्ध गायिका होत्या. त्यांचा जन्म 1945 रोजी तामिळनाडूतील वैल्लोर येथे झाला होता. त्यांचे खरे नाव कलैवानी होते. वाणी यांनी आपल्या करिअरमध्ये 19 भाषांमध्ये गाणी गायली. यात तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, भोजपूरी, तुलू आणि उडिया या भाषांचा समावेश आहे. वाणी यांनी एमएस इलैयाराजा, आरडी बर्मन, केवी महादेवन, ओ.पी नैय्यर आणि मदन मोहन यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम केले होते.

वाणी जयराम यांनी अलीकडेच पार्श्वगायिका म्हणून करिअरची 50 वर्षे पूर्ण केली. 18 भारतीय भाषांमध्ये त्यांनी 10,000 हून अधिक गाणी स्वरबद्ध केली होती. त्यांना 3 वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यांना अलीकडेच देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

1971 मध्ये वाणी जयराम यांना पहिल्यांदा हिंदी चित्रपटात गायनाची संधी मिळाली होती. 'गुड्डी' या चित्रपटाला त्यांनी आपला आवाज दिला होता. या चित्रपटातील 'बोल रे पपीहा' हे गाणे त्यांच्याच आवाजात स्वरबद्ध करण्यात आले होते. यानंतर त्यांनी 'एक मुठ्ठी आसमां', 'खून का बदला खून' आणि 'सोलवा सावन'सह अनेक हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले.

पती टीएस जयरमण यांच्यासोबत वाणी जयराम - फाइल फोटो
पती टीएस जयरमण यांच्यासोबत वाणी जयराम - फाइल फोटो

2018मध्ये झाले होते पतीचे निधन
वाणी जयराम यांचे पती टीएस जयरमण यांचे 2019 मध्ये वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले होते. ते दीर्घकाळापासून आजारी होते. गायिका वाणी जयराम यांच्या आयुष्यात त्यांचे पती टीएस जयरमण यांचे मोठे योगदान होते.

बातम्या आणखी आहेत...