आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:शूटिंगचे अनुभव शेअर करत वाणी कपूर म्हणाली - ‘बेलबॉटम’च्या सेटवर अक्षयने एकदाही काढली नाही खोड, फ्री झाल्यावर खेळायचो विविध गेम

अमित कर्ण. मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊननंतर परदेशात शूटिंगसाठी जाणारी पहिली अभिनेत्री ठरलेल्या वाणी कपूरने ‘दिव्य मराठी’ला सांगितला आपला अनुभव, म्हणाली...
  • 10 तासांऐवजी रोज 6 ते 7 तास ठेवले जायचे शूटिंग शेड्यूल
  • 4दिवसांत एकदा केली जायची टीमची रॅपिड अँटिजन टेस्ट

गेल्या वर्षी लॉकडाऊननंतर चित्रपटाची शूटिंग करणारा पहिला अभिनेता अक्षय कुमार ठरला होता, तर त्याच्यासोबत शूटिंगला जाणारी पहिली अभिनेत्री वाणी कपूर ठरली होती. दोघेही ‘बेलबॉटम’च्या शूटिंगसाठी ग्लासगोला गेले होते. तेथून येऊन तिने आयुष्मानसोबत ‘चंडीगड करे आशिकी’ केला आणि रणबीर कपूरसोबत ‘शमशेरा’चे शूटिंग केले होते.

'बेलबॉटम' या चित्रपटात वाणी अक्षय कुमारसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'बेलबॉटम' या चित्रपटात वाणी अक्षय कुमारसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

शूटिंगचे अनुभव शेअर करत वाणी म्हणाली..,
आतापर्यंत आपण सर्वांनी युद्धाच्या परिस्थितीतच काम केले. लस आली तर हे युद्ध कमी होईल. ग्लासगोमध्ये आम्ही सर्व बायोबबलमध्ये राहत होतो. प्रत्येक चार दिवसांनी आमची तपासणी व्हायची. अक्षय मी आणि बाकीचे लोकही आपापल्या स्तरावर काळजी घेत होतो. प्रॉडक्शनच्या टीमनेदेखील चांगली व्यवस्था आणि काळजी घेतली. या महामारीच्या आव्हानात्मक वातावरणात माझ्या दोन चित्रपटांचे शूटिंग चांगल्या प्रकारे पूर्ण झाले, याचा आनंद आणि समाधान आहे.

'बेलबॉटम'च्या टीमसह वाणी
'बेलबॉटम'च्या टीमसह वाणी

जेणेकरून खेळीमेळीचे वातावरण राहावे...
‘बेलबॉटम’च्या शूटिंगदरम्यान अक्षयने कुणाचीही खोड काढली नाही. आम्ही लोक ब्रेकदरम्यान लूडो आणि मोनोपाेली सारखे खेळ खेळायचो. रात्री डिनरनंतर आम्ही एकत्र यायचो. निर्माते जॅकी भगनानी, ट्विंकल खन्ना आणि इतर लोकही आमच्यासोबत येऊन खेळत. शूटिंग संपल्यावर मी लगेच हॉटेलला जात असते, आधीपासून हीच सवय आहे. मात्र सर्वांनी सोबत जेवण करावे, खेळ खेळावे, जेणेकरून खेळीमेळीचे वातावरण राहील, असे अक्षय सर म्हणायचे.

  • पुढच्या दृश्याच्या चिंतेत असायचो, मात्र रणबीर नोट्स बनवून सहज सीन करायचा
रणबीरसोबतही वाणीच्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.
रणबीरसोबतही वाणीच्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

दुसरीकडे ‘शमशेरा’च्या शूटिंगचा अनुभवदेखील वाणीने सांगितला, यंदा मला रणबीर कपूरसोबतही काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत सेटवरचा अनुभव चांगला होता. रणबीर खूपच शांत आणि समजदार अभिनेता आहे. तो शिस्तप्रिय आहे. सेटवर नेहमी वेळेवर येतो. आम्हाला संवाद पाठ करायला अडचणी यायच्या, मात्र तो फारच सहज पद्धतीने सर्व काही करायचा. प्रत्येक सीनच्या आधी तो नोट्स बनवतो. आम्ही एकदा कॅमेऱ्याच्या मागे जगभराविषयी गप्पा करत बसलो होतो, त्याच वेळी दिग्दर्शकाने आवाज देत अॅक्शन म्हणाला, तोच रणबीर आपल्या पात्रात घुसला. लॉकडाऊनमुळे सर्वांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी वाट पाहिली. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखाच आहे. निर्माते याला चित्रपटगृहाव्यतिरिक्त दुसरीकडे कुठे प्रदर्शित करतील, असे मला वाटत नाही.

बातम्या आणखी आहेत...