आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुली नं. 1 वर सोशल मीडियावर होतोय टीकेचा भडीमार:IMDB वर वरुण-साराच्या चित्रपटाला मिळाले 1.3 रेटिंग, प्रेक्षकांनी 'रेस 3' आणि 'हिम्मतवाला'पेक्षाही ठरवला सुमार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

वरुण धवन आणि सारा अली खान स्टारर 'कुली नं. 1' या चित्रपटाला रिव्ह्यू एग्रीगेटर वेबसाइट (IMDb) वर दुसरे सर्वात कमी रेटिंग प्राप्त झाले आहे. वेबसाइटनुसार, प्रेक्षकांनी सलमान खान स्टारर 'रेस 3' आणि अजय देवगण स्टारर 'हिम्मतवाला' या चित्रपटापेक्षाही या चित्रपटाला सुमार म्हटले आहे. वेबसाइटवर या चित्रपटाला 23000 व्यूअर्सचा रिव्ह्यू मिळाला असून ज्याची 10 पैकी 1.3 सरासरी रेटिंग मिळाले आहे. शिवाय हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आहे. तर सोशल मीडियावरदेखील या चित्रपटातील काही सीनवर मीम्स तयार करण्यात आले आहेत.

77 टक्के प्रेक्षकांनी दिले 1 रेटिंग
23000 पैकी 76.9 (सुमारे 77) टक्के प्रेक्षकांनी म्हणजे 17955 जणांनी 'कुली नं. 1' फक्त 1 रेटिंग दिले आहे. तर 10 पैकी 10 रेटिंग देणार्‍या प्रेक्षकांची संख्या 12.2 टक्के म्हणजेच 2860 आहे. 'हिम्मतवाला'बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाला सरासरी 1.7 आणि 'रेस 3' ला सरासरी 1.9 मिळाली होती. आतापर्यंतचे सर्वात वाईट म्हणजे 1.1 रेटिंग हे संजय दत्त आणि आलिया भट्ट स्टारर 'सडक 2'ला मिळाले होते.

1995 च्या चित्रपटाचा रिमेक

डेव्हिड धवन दिग्दर्शित 'कुली नं. 1' हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरवर रिलीज झाला होता. हा चित्रपट 1995 मध्ये डेव्हिड धवनच्या याच नावाच्या चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यामध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली होती. मात्र रिमेकवर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार बघायला मिळतोय.

बातम्या आणखी आहेत...