आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वरुण धवन आणि सारा अली खान स्टारर बहुप्रतिक्षित 'कुली नंबर 1' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मात्र ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळालेली पहिली प्रतिक्रिया निराशाजनक आहे. लोकांना या चित्रपटाचे मुळ व्हर्जन अधिक चांगले असल्याचे म्हटले आहे. मुळ चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर वरुण-साराच्या चित्रपटात ओव्हर अॅक्टिंग असल्याचे नेटक-यांनी म्हटले आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंड होत असून लोक यावर मजेदार मीम्स बनवत आहेत.
Aeeeee coolie coolie coolie 🌶🌶🌶 trailer out now 💥 https://t.co/eqyqOTw5l7
— VarunDhawan (@Varun_dvn) November 28, 2020
ट्रेलरवर आलेल्या काही प्रतिक्रिया
एका नेटक-याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, "मुळात हे ओरिजिनल कुली नं. 1 चे ओव्हर अॅक्टिंग व्हर्जन आहे." आणखी एका नेटक-याने उपहासात्मक लिहिले की, "डिस्क्लेमर - हा व्हिडिओ बनवताना कोणत्याही गोविंदा आणि मिथुनला इजा पोहोचवण्यात आलेली नाही."
एका नेटक-याने प्रतिक्रिया दिली, "हा चित्रपट सुरक्षित आहे कारण तो प्राइमवर प्रदर्शित होत आहे. चित्रपटगृहांमध्ये नाही. निर्मात्यांचे स्मार्ट पाऊल." एका यूजरने लिहिले, "हे पाहिल्यानंतर गोविंदा - बेटा तुमसे न हो पाएगा". आणखी एका नेटक-याने म्हटले की, "मी खूप उत्साही होतो. पण ट्रेलर पाहिल्यानंतर गोविंदा गोविंदाच आहे."
ट्रेलरवर तयार झालेले काही मीम्स
हा चित्रपट 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे
‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये सारा आणि वरुणसोबत परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीवर, राजपाल यादव हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानीने केली आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 1995 साली प्रदर्शित झालेल्या गोविंदा आणि करिश्मा कपूर स्टारर कुली नं. 1 चा रिमेक आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.