आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1600 वर्षे जुन्या ग्रीक मायथॉलॉजीत मानवी लांडग्याचा उल्लेख:2400 वर्षांपूर्वी नेऊरी जमातीत मानवी लांडगा असल्याचा दावा

लेखक: ईफत कुरैशी5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता वरुण धवन-क्रिती सेननचा चित्रपट भेडिया उद्या 25 नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. लांडगा चावल्यानंतर स्वतः लांडगा बनून लोकांना मारणाऱ्या एका व्यक्तीची ही कथा आहे. अशा प्रकारच्या प्राण्याला वेअरवुल्फ म्हणजेच मानवी लांडगा म्हटले जाते. भारतातील हा अशा प्रकारचा पहिला चित्रपट असेल. मात्र हा हॉलीवूडच्या आवडत्या विषयांपैकी एक राहिला आहे. यावर अनेक चित्रपटही बनले आहेत.

मानवी लांडग्याविषयी जगभरात वेगवेगळ्या थिएरी आहेत. इतिहासात मानवी लांडग्याचा पहिला उल्लेख 2400 वर्षांपूर्वीचा आहे. आजा जिथे पोलंड आणि बेलारुस आहे तिथे कधीकाळी नेऊरी जमातीचे लोक राहायचे. मानले जाते की या जमातीचे लोक वर्षात एकदा लांडगा बनायचे. इसवी सन 425 मधील इटलीतील एक पुस्तक सिटी ऑफ गॉडचे लेखक बिशप सेंट ऑगस्टाईन ऑफ हिप्पोंनीही अशा चेटकिणींचा उल्लेख केला आहे, ज्या लांडगा बनायच्या.

ग्रीक मायथोलॉजीपासून 18 व्या शतकापर्यंत जगातील अनेक संस्कृतींमध्येही मानवी लांडगा म्हणजेच वेअरवूल्फचा उल्लेख आहे.

बॉलीवूड चित्रपट भेडियाच्या पार्श्वभूमीवर आज जाणून घेऊया की मानवी लांडग्याविषयी जगात कशा कथा आणि मान्यता आहेत...

मानवी लांडग्याविषयी रंजक मान्यता

19 व्या शतकात ज्यूंचे असे मानणे होते की जर एखाद्या मानवी लांडग्या मृतदेह नष्ट केला नाही तर काही वर्षांनंतर तो पुन्हा जिवंत होईल.

जर्मनी, फ्रान्स आणि उत्तर फ्रान्समधील लोकांची मान्यता आहे की जे लोक पापामुळे मृत होतात, ते रक्तपिपासू मानवी लांडगा बनून परततात.

हंगेरियन लोक कथांनुसार ट्रासडानुबियात राहणारे शापित लोक मानवी लांडगा बनतात.

अर्मेनियन लोक कथांनुसार पापी महिलांना जीवनातील 7 वर्षे मानवी लांडगा बनून रहावे लागते.

मानवी लांडग्याचा सिद्धांत सिद्ध करणाऱ्या खऱ्या घटना

  • 1541 मध्ये इटलीतील एका गावातील लोक अचानक गायब होत होते. अनेक महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांच्या असे निदर्शनास आले की, एका शेतकऱ्यानेच मानवी मांस खाण्यासाठी या लोकांची हत्या केली होती. त्या शेतकऱ्याच्या अंगावर लांडग्यासारखे केस होते. जेव्हा शेतकऱ्याला कैद करून त्याच्या केसांची पडताळणी करण्यात आली तेव्हा कळाले की त्याला वेगळाच आजार होता. यात तो स्वतःला मानवी लांडगा समजून लोकांना खायचा आणि कोल्ह्यासारखे वर्तन करायचा. विज्ञानानुसार हे सिद्ध होऊ शकले नाही, त्यानंतर त्याला मृत्यूदंड देण्यात आला.
  • 1640 मध्ये जर्मनीतील ग्रीफ्सवाल्ड शहरातही वेअरवूल्फच्या नावाने दहशत पसरली होती. जो व्यक्ती अंधारात बाहेर पडायचा तो वेअरवूल्फकडून मारला जाण्याचा धोका होता. एका विद्यार्थ्यांच्या समूहाने रात्री गर्दी गोळा करत ही दहशत संपवली होती.
  • 1685 मध्ये बव्हेरियन शहरातही एका लांडग्याने दहशत माजवली होती. स्थानिक लोकांचा असा समज होता की, शहराचे महापौरच वेअरवूल्फ बनून रात्री फिरायचे. गर्दीने एके दिवशी धाडसाने लांडग्याला मारले आणि त्याचे चामडे घालून रस्त्यांवर निदर्शने केली. नंतर ते चामडे स्थानिक संग्रहालयात ठेवण्यात आले.
  • 14 डिसेंबर 1598 रोजी एका व्यक्तीला हत्येच्या आरोपात पॅरिस कोर्टात हजर करण्यात आले होते. त्या व्यक्तीने इतक्या भयानक पद्धतीने हत्या केल्या होत्या की कोर्टाने केसशी निगडीत सर्व दस्तावेज नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्याने अनेक मुलांची हत्या केली, गळे कापले आणि त्यांच्या शरीराचे अनेक तुकडे केले. वेगवेगळे तुकडे एकमेकांना जोडले. कोर्टाने त्याला जाळून मारण्याची शिक्षा सुनावली होती. तो नरभक्षी मानव किंवा मानवी लांडगा असल्याचे म्हटले गेले होते.
  • 16-3 मध्ये गेसकॉनी, फ्रान्समधील एका गावातून लोक सातत्याने गायब व्हायला लागले होते. तपासात एका 12 वर्षीय मुलीने सांगितले की, पौर्णिमेच्या रात्री मानवासारख्या दिसणाऱ्या एका लांडग्याने तिच्यावर हल्ला केला होता.

1897 मध्ये आली पहिली कादंबरी
वेअरवूल्फवर पहिली कादंबरी ड्रॅक्युला अँड ड्रॅक्युलाज गेस्ट 1897 मध्ये ब्राम स्टॉकर यांनी लिहिली होती. 1928 मध्ये द वूल्फ्स ब्राईडः अ टेल फ्रॉम इस्टोनिया आयनो कालाज यांनी लिहिली होती.

(ग्राफिक्स - अंकित पाठक)
Reference-

https://listverse.com/2012/01/25/10-true-life-werewolves/

https://listverse.com/2012/01/25/10-true-life-werewolves/

https://mythicalrealm.com/mythical-creatures/werewolf/

बातम्या आणखी आहेत...